advertisement

चुकीला माफी नाही! सूनेसोबतचं ‘ते’ वागणं भोवलं, पुणेकर सासू-सासऱ्यांना अद्दल

Last Updated:

Pune News: लग्नात सुनेच्या कुटुंबीयांनी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले होते. तसेच 55 तोळे सोने, दोन किलो चांदी आणि आलिशान मोटारही दिली होती.

चुकीला माफी नाही! सूनेसोबतचं ‘ते’ वागणं भोवलं, पुणेकर सासू-सासऱ्यांना अद्दल
चुकीला माफी नाही! सूनेसोबतचं ‘ते’ वागणं भोवलं, पुणेकर सासू-सासऱ्यांना अद्दल
पुणे: शेअर मार्केटमध्ये दोन कोटींचं कर्ज झाल्यानंतर माहेराहून पैसे आणण्यासाठी सुनेवर दबाव टाकण्याचा प्रकार पुण्यात घडला. आता सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणं सासू-सासऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे व नणंदेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता पुणे येथील विशेष न्यायाधीश एस. एस. सस्ते यांनी आरोपांची गंभीर दखल घेत सासू-सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
पुण्यातील 26 वर्षीय विवाहितेने माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची फिर्याद लोहगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पती आदित्य अनिल लोखंडे (वय 28) याच्यासह सासरे अनिल किसन लोखंडे (53), सासू सुवर्णा (वय 48) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
या गुन्ह्यातील आरोपी नणंद समृद्धी लोखंडे हिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तर पती आणि सासू-सासरे न्यायालयीन कोठडीत आहेत. सासरे अनिल लोखंडे व सासू सुवर्णा लोखंडे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने आरोपांची गंभीर दखल घेत हा जामीन अर्ज फेटाळला.
शेअर मार्केटच्या कर्जासाठी टोकाचं पाऊल
पती आदित्य अनिल लोखंडे याला शेअर मार्केटमध्ये तोटा झाला होता. यातील सुमारे दोन कोटींचे कर्ज फेडण्यासाठी तो पत्नीवर माहेराहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. त्यासाठी सतत शिवीगाळ, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
advertisement
दरम्यान, अनिल लोखंडे हे मुळशी परिसरातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नात सुनेच्या कुटुंबीयांनी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले होते. तसेच 55 तोळे सोने, दोन किलो चांदी आणि आलिशान मोटारही दिली होती. तरीही त्यांनी सुनेच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
चुकीला माफी नाही! सूनेसोबतचं ‘ते’ वागणं भोवलं, पुणेकर सासू-सासऱ्यांना अद्दल
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement