advertisement

Bhiwandi Crime : क्षणार्धात होत्याचं नव्हतं! पतीसोबत चालणाऱ्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; अख्खा परिसर सुन्न

Last Updated:

Bhiwandi Crime News : भिवंडी शहरात एक महिलेला पायी जाण चांगलंच महागात पडलेले आहे. नेमकं काय घडलं याबाबतीच सविस्तर माहिती ही जाणून घ्या.

News18
News18
भिवंडी : भिवंडी शहरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेने कधीच विचारही नसेल केला असं काही तिच्यासोबत घडलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घडतं काय?
भिवंडी शहरात चोरीच्या घटना थांबताना दिसत नाही, त्यात आता पतीसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेला चोरट्यांनी लक्ष्य केलेले आहे. ज्यात दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी चक्क धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात असलेल्या एका शाळेजवळ घडली. निशा जोजो पारेकाटील असे या महिलेचे नाव असून त्या आपल्या पतीसोबत रस्त्याने पायी जात होता. दरम्यान त्यावेळी अचानक दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी पळवली. हे चोरटे इतक्या वेगाने आले की काही समजण्याच्या आता ते पसार झाले. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
या घटनेप्रकरणी नीशा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नारपोली या पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलीस सध्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच तपासणी करत असून आरोपींचा शोध घेत आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi Crime : क्षणार्धात होत्याचं नव्हतं! पतीसोबत चालणाऱ्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; अख्खा परिसर सुन्न
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement