फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी दमदार योजना! सिंचन पंप खरेदीसाठी 40,000 रु मिळणार, पात्रता काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sinchan Pump Anudan Yojana : राज्य सरकार शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी सहज उपसता यावे आणि शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.
मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी सहज उपसता यावे आणि शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम 40 हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना 10 अश्वशक्ती (HP) क्षमतेपर्यंतचे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपसंच खरेदी करता येणार आहेत.
योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याच्या स्रोतांपर्यंत शेतकऱ्यांचा सहज आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर प्रवेश निर्माण करणे. विहीर, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर केलेले जलसाठे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे. यामुळे शेतीचे पाणी वेळेवर उपलब्ध होईल, सिंचन प्रक्रिया पुरेशी व स्थिर राहील आणि शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.
शेतकऱ्यांना मिळणारे प्रमुख फायदे
90% अनुदानामुळे पंपसंच खरेदीचा आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार.
advertisement
पंपसंचाद्वारे विहीर किंवा शेततळ्यांमधून पाणी सहज, जलद आणि कार्यक्षमतेने काढता येणार. पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढ, दर्जा सुधारणा आणि नफ्यात वाढ अपेक्षित. आधुनिक व कार्यक्षम पंपसंचामुळे पाण्याची बचत होऊन पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल.
योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय?
अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित असेल. BPL (दारिद्यरेषेखालील) शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य.
advertisement
BPL शेतकऱ्यांना जमिनीची वरची मर्यादा लागू नाही.
इतर शेतकऱ्यांकडे 0.40 ते 6 हेक्टर शेती असणे आवश्यक.
दुर्गम भागात 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास एकत्र अर्ज केल्यास पात्रता मिळते. राज्यातील सर्व कृषी योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID) अनिवार्य.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)
जात प्रमाणपत्र
आधार लिंक असलेले बँक खाते
advertisement
BPL प्रमाणपत्र (लागू असल्यास)
विशेष म्हणजे, शेतकरी ओळख क्रमांक उपलब्ध असल्यास सातबारा, ८-अ उतारा किंवा आधार कार्डाची वेगळी आवश्यकता राहणार नाही.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर अर्ज करावा.https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी दमदार योजना! सिंचन पंप खरेदीसाठी 40,000 रु मिळणार, पात्रता काय?


