VIDEO : 10 सिक्स, 6 चौकार, 43 बॉलमध्ये ईशानने घाम फोडला, न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ईशान किशनने अवघ्या 42 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. या शतकादरम्यान त्याने 10 षटकार आणि 6 चौकार मारले आहे.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240 च्या आसपास होता.
India vs New Zealand 5th T20i : तिरूवनंन्तपुरममधील ग्रीनफिल्डच्या मैदानात सूरू असलेल्या सामन्यात ईशान किशननने वादळी शतक ठोकलं आहे. ईशान किशनने अवघ्या 42 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. या शतकादरम्यान त्याने 10 षटकार आणि 6 चौकार मारले आहे.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240 च्या आसपास होता. ईशान सोबत कॅप्टन सूर्यकुमार यादवने केलेल्या 63 धावांच्या बळावर भारताने 271 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे न्यूझीलंडसमोर 272 धावांचे लक्ष्य आहे.
खरं तर प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरला होता. यावेळी संजू त्याच्या होमग्राऊंडवरही मोठी खेळी करेल असे वाटत होते. पण पाचव्या टी20 त तो फेल ठरला. त्याच्यानंतर अभिषेक शर्मा 16 बॉलमध्ये 30 धावा करून बाद झाला.त्याच्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात होती.
MAIDEN T20I HUNDRED FOR ISHAN KISHAN. 💯
- The celebration between Kishan and Hardik Pandya was pure bliss. 🥺❤️
pic.twitter.com/lgS011uBoM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2026
advertisement
यावेळी ईशान किशनने पहिल्यांदा 28 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. त्यानंतर पुढे त्यांनी तडाखेबाज फलंदाजी करून 42 बॉलमध्ये शतक ठोकलं.या शतकानंतर तो बाद झाला होता. ईशानने या शतकादरम्यान त्याने 10 षटकार आणि 6 चौकार मारले आहे.या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240 च्या आसपास होता.विशेष म्हणजे हे ईशानच पहिलं टी20 शतक होतं.
advertisement
ईशान सोबत कॅप्टन सूर्यकुमार यादवने 30 बॉलमध्ये केलेल्या 63 धावांची खेळी केली होती.सूर्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या क्षणी येऊन 17 बॉलमध्ये 42 धावा केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि एक चौकार मारला आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 247 होता.त्यानंतर रिंकू सिंह 8 आणि शिवम दुबे 7 धावांवर नाबाद राहिला होता. त्यामुळे या धावांच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांची खेळी केली होती.त्यामुळे न्यूझीलंड समोर 272धावांचे आव्हान आहे.
advertisement
न्यूझीलंडकडू लॉकी फर्ग्युसनने 2, जॅकॉब डफी,कायली जेमिन्सस आणि मिचेल सॅटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 8:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 10 सिक्स, 6 चौकार, 43 बॉलमध्ये ईशानने घाम फोडला, न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर










