Mobile Interesting Facts : मोबाईल फोन Restart केल्यानंतर तो जास्त Smooth कसा चालतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Phone Restart : मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला की आपण तो रिस्टार्ट करतो आणि पाहाल तर त्याची समस्या लगेच दूर होतो. तो खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो. हे कसं काय होतं? याचा विचार तुम्ही केला आहे का?
मोबाईल नवीन घेतला की तो खूप छान चालतो. पण काही दिवस सतत वापरल्यानंतर तो थोडा स्लो होतो, अडकतो, हँग होतो. मोबाईलमध्ये अशी कोणतीही समस्या आली की आपण सगळ्यात आधी तो ऱिस्टार्ट करतो आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा स्मूथ, फास्ट आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू लागतो. यामागे मोबाईलच्या सिस्टीमची काही महत्त्वाची कारणं आहेत.
advertisement
स्मार्टफोन वापरताना अनेक अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात. जरी आपण अ‍ॅप बंद केलं तरी त्याचे काही प्रोसेस, कॅशे फाइल्स किंवा बॅकग्राऊंड सर्व्हिसेस सक्रिय राहू शकतात. हळूहळू या सर्व सेवांमुळे रॅम भरायला लागते आणि मग प्रोसेसरला फाइल्स आणि अ‍ॅप्स जलद लोड करण्यासाठी जागा कमी पडते. यामुळे मोबाइल स्लो होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


