Numerology: लहानपणापासूनच हुशार असणाऱ्या मुलांचा जन्म या 4 तारखांचा असतो; आई-बापाचं नाव रोशन करतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mulank and Personality: काही लोक जन्मापासूनच काही गोष्टींमध्ये पारंगत असतात. लहानपणापासून हुशार मुले आपण पाहिली असतील, तर काही मूलं सुरुवातीला जेमतेम असतात आणि नंतर वेगाने प्रगती करू लागतात. अंकशास्त्रानुसार जन्मतारखेच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा मूलांक क्रमांक काढू शकता आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊ शकता.
advertisement
advertisement
मूलांक 3 असलेल्यांवर गुरूचा आशीर्वाद - अंकशास्त्रानुसार, 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक 3 असतो. 3 मूलांकावर गुरू ग्रहाची कृपा असते. त्यामुळेच ही मुले ज्ञानात श्रेष्ठ बनतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात, गुरू हा ज्ञान, बुद्धी, धर्म आणि उच्च शिक्षणासाठी कारक ग्रह मानला जातो. गुरूची कृपा आयुष्यात नशीब आणि यश मिळवून देते.
advertisement
3 मूलांक असलेले लोक खूप उत्साही आणि जिज्ञासू असतात - गुरूच्या प्रभावाने मूलांक 3 असलेल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण असते, कामे प्रभावीपणे करू शकतात. जन्मापासून त्यांच्यामध्ये ठरवलेलं काम करण्यासाठी धैर्य आणि दृढनिश्चय असतो. सर्वात कठीण कामांनाही संधी मानून करण्याचा प्रयत्न करतात. ही मुले खूप उत्साही आणि जिज्ञासू असतात. त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळाली तर ते लगेच आव्हान स्वीकारतात.
advertisement
advertisement
3 मूलांकाचे लोक या क्षेत्रात भरभराटीला येतात - मूलांक 3 असलेले लोक बुद्धिमान असतात. ते अडचणींमध्ये लगेच विचार करतात आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्या बुद्धीचा योग्य वापर करतात. म्हणूनच ते केवळ त्यांच्या अभ्यासातच उत्कृष्ट नसतात तर जीवनाच्या इतर क्षेत्रातही यश मिळवतात. त्यांची विचारसरणी कधीही मर्यादित नसते आणि ते नेहमीच नवीन मार्ग शोधत असतात. मूलांक 3 असलेले लोक पोलीस, सैन्य किंवा प्रशासकीय सेवांसारख्या क्षेत्रात अनेकदा वेगाने प्रगती करतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


