'किती खालच्या पातळीवरचा...', वाल्मीकच्या आठवणीवरून मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना परळीत झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची आठवण झाल्याची चर्चा आहे.
माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महायुतीच्या प्रचारसभेत त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची आठवण झाल्याची चर्चा आहे. त्यांनी वाल्मीकची अप्रत्यक्ष आठवण काढल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीची आठवण येणारा किती खालच्या पातळीवरचा असू शकतो. आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डोळे उघडावे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, यावर धनंजय देशमुखांनी देखील प्रतिक्रिया दिली. खरं कधी लपत नाही आणि खोटं कधी झाकता येत नाही. खून, खंडणी, गुन्हेगारी जिल्ह्यात कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा या गोष्टी सुरु करण्यासाठी उणीव भासत असावी अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
advertisement
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले?
राजकीय स्वार्थापोटी परळीची राज्यात बदनामी केली गेली. आज ९ महिने झाले कार्यालय सुरू आहे. मात्र आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही, याची जाणीव होते, असे वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत महायुतीच्या प्रचार सभेत केले. त्यांनी वाल्मीक कराडची आठवण काढल्याची चर्चा आहे.
परळीत मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, आज एक माणूस आपल्यात नाही याची जाणीव मला आहे. कार्यकर्त्यांना सहकारी मानून मी काम करतो असे त्यांनी सांगितले. धनंजय मुंडेंचा रोख संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कारागृहात असलेला आरोपी वाल्मीक कराडच्या दिशेनेच होता, असं बोललं जातंय.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 25, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'किती खालच्या पातळीवरचा...', वाल्मीकच्या आठवणीवरून मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका


