advertisement

Pune News: 'खाकी'तील देवदूत; मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या व्यक्तीला परत आणलं, असं वाचवलं आयुष्य

Last Updated:

कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवण्यात नांदेड सिटी पोलिसांना यश आलं आहे. ऐनवेळी दाखवलेल्या तत्परतेमुळं एका कुटुंबाचा आधार कोसळण्यापासून वाचला

पोलिसांनी मृत्यूच्या दारातून आणलं परत (प्रतिकात्मक फोटो)
पोलिसांनी मृत्यूच्या दारातून आणलं परत (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवण्यात नांदेड सिटी पोलिसांना यश आलं आहे. ऐनवेळी दाखवलेल्या तत्परतेमुळं एका कुटुंबाचा आधार कोसळण्यापासून वाचला असून, पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
लोहगाव पोलीस ठाण्याकडून नांदेड सिटी पोलिसांना एका तरुणाच्या आत्महत्येच्या संदर्भात माहिती मिळाली. रमेश (नाव बदललेलं) नावाचा हा तरुण घरगुती त्रासामुळे फाशी घेऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. ही माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोहर खराडे, शुभम चव्हाण आणि होमगार्ड रोहित राऊत यांनी तातडीने सूत्रे हलवली.
advertisement
पोलिसांचा धाडसी शोध
पोलिसांनी तातडीनं संबंधित तरुणाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, तो तरुण उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत होता. पोलिसांनी हार न मानता तांत्रिक मदतीनं त्याचं 'लोकेशन' ट्रेस केलं. पथक खडकवासला परिसरात पोहोचलं, परंतु तो तरुण तिथून निघून गेला होता. पोलिसांनी तिथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली आणि शोधमोहीम तीव्र केली. अखेर, अत्यंत शिताफीने या तरुणाला शोधून पोलिसांनी त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलं आणि त्याचे प्राण वाचवले.
advertisement
या कामगिरीबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस म्हणाले की, "वेळेवर मिळालेली माहिती आणि त्यावर केलेली तत्पर कृती यामुळेच एका व्यक्तीचे प्राण वाचवणे शक्य झाले. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचा आम्हाला अभिमान आहे." पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाचा मुलगा वाचला आहे. पोलीस दलातील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: 'खाकी'तील देवदूत; मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या व्यक्तीला परत आणलं, असं वाचवलं आयुष्य
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement