Pune: कात्रज बायपासला जरा दमानं, वाहतूक पोलिसांचे नवे नियम, पहिल्याच दिवशी 110 जणांना दंड!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Traffic: पुण्यातील नवले पूल अपघातानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.
पुणे: वाहतुकीतील वाढता वेग, नियमांकडे दुर्लक्ष आणि सतत होणारे अपघात या पार्श्वभूमीवर कात्रज बायपास मार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे शहर वाहतूक शाखेने नव्या आदेशांची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू केली. पहिल्याच दिवशी तब्बल 110 वाहनचालकांनी वेगमर्यादा ओलांडल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात आली.
नवीन यंत्रणेनुसार बायपासवर विविध ठिकाणी हाय-रिझोल्युशन स्पीड गन्स, एएनपीआर कॅमेरे आणि मोबाइल ट्रॅकिंग युनिट्स बसवण्यात आले आहेत. सकाळपासूनच पोलिसांच्या टीम्स स्वामी नारायण मंदिर चौक, भुमकर चौक, नवले पुलाजवळ आणि कात्रज घाट भागात तैनात होत्या. वेगाने धावणारी वाहने ओळखून तात्काळ डिजिटल चलन जारी करण्यात आले.
advertisement
नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघातानंतर उपाययोजना म्हणून कात्रज बायपासवरील भूमकर ब्रीज ते नवले ब्रीज शेवटपर्यंत मार्गावर सर्वप्रकारच्या वाहनांवर वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. मात्र अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
या नवीन वेगमर्यादा नियमांची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली. अपघातानंतर पोलिस वाहतूक कर्मचाऱ्यांनी महामार्गावर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5620 वाहनांवर कारवाई करून 33 लाख 5200 रुपयांचा दंड वसूल केला.
advertisement
15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम
15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 833 वाहनांवर कारवाई करून 17 लाख 63 हजार रुपये दंड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून वसूल करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 26, 2025 7:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: कात्रज बायपासला जरा दमानं, वाहतूक पोलिसांचे नवे नियम, पहिल्याच दिवशी 110 जणांना दंड!


