advertisement

Navi Mumbai: नवी मुंबईत कोचिंग क्लास इमारत दुर्घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Last Updated:

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील सेक्टर २ मधील विद्याभवन सोसायटी परिसरात ही घटना घडली.

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई:  नवी मुंबईतील  कोपरखैरणे परिसरात एका सोसायटीमध्ये कोचिंग क्लास सुरू असताना स्लॅब कोसळून दुर्घटना घडली होती. या अपघातात एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील सेक्टर २ मधील विद्याभवन सोसायटी परिसरात ही घटना घडली. या सोसासटीत असलेल्या एका खाजगी शिकवणी वर्गावर पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.  मनीष मसे  असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. सातवी वर्गात शिकणारा हा विद्यार्थी असून दुर्घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या क्लासमध्ये तो शिकवणीसाठी आला होता, अशी माहिती नवी मुंबईचे पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली.
advertisement
काय घडलं नेमकं?
कोपरखैरणेतील विद्याभवन सोसायटीमध्ये तळमजल्यावर एका खाजगी कोचिंग क्लास सुरू होता. क्लास सुरू असताना अचानक पहिल्या मजल्यावर असलेल्या घराचा संपूर्ण स्लॅब कोसळला. स्लॅब जेव्हा कोसळला तेव्हा क्लासमध्ये या १८ विद्यार्थी होते. स्लॅब खाली १८ विद्यार्थी अडकले होते.  घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तातडीच्या बचावकार्यामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.
advertisement
पण, एक सातव्या वर्गात शिकणारा मनीष मसे हा विद्यार्थी जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.  साधारण 30 वर्ष जुनी इमारत असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा मुद्या ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई पालिकेनं अनेक अशा धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. पण, अशा धोकादायक इमारतींमध्ये अजूनही नागरिक जीव मुठीत धरून वास्तव्यास असल्याचं समोर आलं आहे. त्याामुळे पालिका अशा धोकादायक इमारतींवर कधी कारवाई करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai: नवी मुंबईत कोचिंग क्लास इमारत दुर्घटनेत 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement