advertisement

"तिकडे बघ... तिकडे!" रश्मिकाला कोणी पाहिलं तरी विजयचा चढतो पारा; रिसेप्शनमधला विज्जूचा 'अर्जुन रेड्डी' अवतार व्हायरल

Last Updated:

Vijay Devarakonda: विजय देवरकोंडा पडद्यावर जेवढा ॲग्रेसिव्ह दिसतो, खऱ्या आयुष्यातही तो आपल्या पत्नीसाठी, म्हणजेच रश्मिका मंदाना हिच्यासाठी तितकाच पजेसिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

News18
News18
हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा पडद्यावर जेवढा ॲग्रेसिव्ह दिसतो, खऱ्या आयुष्यातही तो आपल्या पत्नीसाठी, म्हणजेच रश्मिका मंदाना हिच्यासाठी तितकाच पजेसिव्ह असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिकाला एकटक पाहणाऱ्या एका व्यक्तीला विजयने ज्या पद्धतीने टोकलं, ते पाहून चाहत्यांना त्याच्या 'अर्जुन रेड्डी' मधील भूमिकांची आठवण झाली आहे.

विजयने थेट सुनावलं

४ मार्च रोजी हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये या जोडीचं भव्य रिसेप्शन पार पडलं. यावेळी नवविवाहित जोडपं मीडिया आणि चाहत्यांसोबत फोटो क्लिक करून घेत होतं. व्हिडिओमध्ये दिसतंय की, विजय आणि रश्मिका एका ग्रुप फोटोसाठी उभे आहेत. त्याच वेळी विजयच्या लक्षात येतं की, समोर उभा असलेला एक कॅमेरामन किंवा चाहता कॅमेऱ्याकडे पाहण्याऐवजी रश्मिकाला एकटक न्याहाळत आहे.
advertisement
हे पाहताच विजयने विलंब न लावता त्या व्यक्तीला टोकलं. त्याने थेट कॅमेऱ्याकडे बोट दाखवत हिंदीत म्हटलं, "उधर देख... उधर!" विजयचा हा रोखठोक अंदाज पाहून रश्मिकाही हसायला लागली. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या असून, "बायको रश्मिका मंदाना असेल, तर पती पजेसिव्ह होणारच!" असं अनेकांनी म्हटलं आहे.
advertisement
advertisement

साडी आणि लुंगीमध्ये 'विरोश'चा जलवा

आजच्या काळात जिथे सेलिब्रिटी पेस्टल रंगाचे लेहेंगे आणि पाश्चात्य पेहरावाकडे झुकत आहेत, तिथे विजय आणि रश्मिकाने आपल्या मुळांशी घट्ट नातं जपलं आहे. रिसेप्शनसाठी रश्मिकाने सोन्याचे दागिने आणि गडद लाल रंगाची मैसूर सिल्क साडी नेसली होती. भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र असलेल्या रश्मिकाच्या साध्या पण राजेशाही लूकवर चाहते फिदा झाले आहेत. विजयने पारंपारिक पांढरा कुर्ता आणि दाक्षिणात्य वेष्टी परिधान केली होती. त्याने अतिशय साधेपणाने पण रुबाबदारपणे या सोहळ्याचं यजमानपद भूषवलं.
advertisement

उदयपूरमध्ये शाही लग्न; हैदराबादमध्ये रॉयल रिसेप्शन

२६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी तिरुपती देवस्थानला भेट दिली आणि चाहत्यांसाठी 'अन्नदान'ही केलं. हैदराबादच्या रिसेप्शनला चिरंजीवी, अल्लू अर्जुन, राम चरण, नागार्जुन आणि बॉलिवूडमधून करण जोहर, कृती सेनन यांसारख्या दिग्गजांनी हजेरी लावून या जोडप्याला आशीर्वाद दिले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"तिकडे बघ... तिकडे!" रश्मिकाला कोणी पाहिलं तरी विजयचा चढतो पारा; रिसेप्शनमधला विज्जूचा 'अर्जुन रेड्डी' अवतार व्हायरल
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement