advertisement

संसार मोडला अन् विजयने कन्फर्म केलं रिलेशनशिप! घटस्फोटादरम्यान रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट, VIDEO

Last Updated:

Thalapathy Vijay-Trisha Krishnan: विजय आणि त्याची गाजलेली सह-अभिनेत्री तृषा कृष्णन यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे आगीत तेल ओतण्याचं काम झालं आहे.

News18
News18
मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि 'थलापथी' म्हणून ओळखला जाणारा विजय सध्या आपल्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्णलिंगम यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली आहे. अशातच, विजय आणि त्याची गाजलेली सह-अभिनेत्री तृषा कृष्णन यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामुळे आगीत तेल ओतण्याचं काम झालं आहे.

२७ वर्षांचं नातं संपुष्टात, संगीताचे गंभीर आरोप

विजय आणि संगीता यांचा विवाह १९९९ मध्ये झाला होता. एका चाहतीपासून पत्नीपर्यंतचा संगीताचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखाच होता. मात्र, आता हे २७ वर्षांचं जुनं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. रिपोर्ट्सनुसार, संगीताने चेन्नईतील चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
संगीताने आपल्या १२ पानांच्या याचिकेत विजयवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यामधील सर्वात मोठा आरोप म्हणजे, विवाहबाह्य संबंध. संगीताचा असा आरोप आहे की, एप्रिल २०२१ मध्ये तिला विजयच्या एका अभिनेत्रीसोबत असलेल्या अफेअरबद्दल समजलं. विजयने वारंवार आश्वासन देऊनही हे संबंध तोडले नाहीत, ज्यामुळे संगीताला प्रचंड मानसिक त्रास झाला. ती अभिनेत्री सोशल मीडियावर विजयसोबतचे फोटो शेअर करत असे, ज्यामुळे संगीता आणि त्यांच्या दोन्ही मुलांना जॅसन आणि दिव्या यांना सार्वजनिकरीत्या अपमानाला सामोरं जावं लागलं.
advertisement
चर्चा अशीही आहे की, विजय हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्यासाठी संगीताला २५० कोटी रुपयांची पोटगी देण्यास तयार आहे, जेणेकरून त्याच्या राजकीय प्रतिमेला तडा जाऊ नये.

तृषा कृष्णनसोबतची एन्ट्री अन् नेटिझन्सचा संताप

घटस्फोटाच्या या गदारोळात विजय आणि तृषा कृष्णन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार शेअर केला जातोय. एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाच्या लग्न समारंभात हे दोघंही एकत्र पोहोचले होते. 'गिल्ली' आणि 'लिओ' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत एकत्र दिसलेल्या या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरी या याचिकेत कोणत्याही अभिनेत्रीचं नाव घेतलेलं नसलं, तरी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर मात्र तृषा कृष्णनच आहे.
advertisement

२० एप्रिलला होणार पुढची सुनावणी

विजयने आता चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात (TVK Party) प्रवेश केला आहे. अशा वेळी हा वैयक्तिक वाद त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी धोक्याचा ठरू शकतो. कोर्टाने विजयला २० एप्रिल २०२६ रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर आणि आई शोबा यांनीही या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
संसार मोडला अन् विजयने कन्फर्म केलं रिलेशनशिप! घटस्फोटादरम्यान रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट, VIDEO
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement