advertisement

'गाडी हळू चालव' सांगणं जीवावर बेतलं! रस्त्यावरचा वाद घरात पोहोचला, टिटवाळ्यात तुफान राडा

Last Updated:

किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळीने संबंधित कुटुंबाच्या घरी जात लोखंडी हत्यारांनी अमानुष मारहाण केली.

News18
News18
ठाणे : कल्याणजवळील टिटवाळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला 'गाडी हळू चालव' असे सांगणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. या किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळीने संबंधित कुटुंबाच्या घरी जात लोखंडी हत्यारांनी अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने गाडी चालवली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्याने 'गाडी हळू चालव, अपघात होईल' असा सल्ला दिला. मात्र, हा सल्ला दुचाकीस्वाराच्या जिव्हारी लागला. काही वेळातच त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांना बोलावून घेतले आणि पीडित कुटुंबाच्या घराबाहेर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.
advertisement

तीन जण जखमी

हातात लोखंडी रॉड आणि इतर घातक हत्यारे घेऊन आलेल्या या टोळीने घराच्या दरवाजावर हल्ला केला. घराची तोडफोड करत असतानाच आरोपींनी घरात घुसून सदस्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांचा आक्रमक पवित्रा पाहून घाबरलेल्या कुटुंबाने स्वतःला एका खोलीत तब्बल अर्धा तास कोंडून घेतले. या अर्ध्या तासात बाहेरून घराची तोडफोड आणि शिवीगाळ सुरूच होती. सुदैवाने, खोलीचा दरवाजा मजबूत असल्याने मोठा अनर्थ टळला, तरीही या मारहाणीत कुटुंबातील तीन जण रक्तबंबाळ झाले आहेत.
advertisement

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला राडा

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये टोळीतील तरुण हातात हत्यारे घेऊन दहशत माजवताना स्पष्ट दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे टिटवाळा पोलिसांनी तपास चक्रावून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांची कारवाई  

याप्रकरणी कल्याण ग्रामीण मधील टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरवस्तीत अशा प्रकारे टोळीने घरात घुसून मारहाण केल्याने टिटवाळ्यातील नागरिक धास्तावले आहेत. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
'गाडी हळू चालव' सांगणं जीवावर बेतलं! रस्त्यावरचा वाद घरात पोहोचला, टिटवाळ्यात तुफान राडा
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement