Weather Alert: ऐन हिवाळ्यात वारं फिरलं; पाऊस नव्हे आता वेगळा अलर्ट, मुंबईसह कोकणातील हवामान अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. ऐन हिवाळ्यात थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर ओसरत असून आता मुंबईसह कोकणातील हवामानात पुन्हा बदल दिसू लागला आहे. सकाळच्या गारव्यानंतर दिवसभरात उष्णता वाढत आहे. आज कोकण किनारपट्टीपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईपर्यंत सर्वत्र हवामान पूर्णत: कोरडे राहणार आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही आणि तापमानात थोडी वाढ दिसू शकते. बुधवारचं अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान पूर्णपणे कोरडे राहील. सकाळच्या वेळी हलका गारवा जाणवेल. रायगडमध्ये किमान तापमान 20–21°C, रत्नागिरीत 21°C, तर सिंधुदुर्गमध्ये 21–22°C राहण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत तापमान हळूहळू वाढत जाईल आणि या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30–32°C दरम्यान पोहोचेल. गेल्या काही दिवसांत जिथे हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती, तिथे आता हवामान स्वच्छ, कोरडे आणि उबदार राहणार आहे.










