advertisement

Gautam Gambhir : सगळे वाद मिटले! मैत्रीचा हात पुढे करत गंभीरचं मोठं वक्तव्य, धोनी होणार टीम इंडियाचा कोच;VIDEO

Last Updated:

गौतम गंभीरने एमएस धोनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हा मैत्रीचा हात पुढे करताना गौतम गंभीर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.

gautam gambhir ms dhoni
gautam gambhir ms dhoni
Gautam Gambhir On MS Dhoni : टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यातील वाद तुम्हाला सर्वश्रूत असेल. पण टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप विजयानंतर एमएस धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून कोच गौतम गंभीर आणि टीम इंडियाचे कौतुक केले होते.यानंतर गौतम गंभीरची देखील प्रतिक्रिया समोर आली होती.पण आता गौतम गंभीरने एमएस धोनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हा मैत्रीचा हात पुढे करताना गौतम गंभीर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
धोनीने भारताच्या या विजयानंतर इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीच कौतुक करताना एम एस धोनीने गौतम गंभीरच कौतुक केलं होतं. कोच साहब तुमच्या चेहऱ्यावर हास्य खुप छान दिसतं आहे. गंभीरची मैदानातील जिंकण्याची इच्छाशक्ती आणि हे हास्य म्हणजे एक 'किलर कॉम्बो' असल्याचं धोनीने मिश्किलपणे म्हटलं आहे.त्यामुळे धोनीच्या या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
advertisement
धोनीच्या याच स्टोरीवर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर देखील रिअॅक्ट झाला होता. हसण्यामागचे हे कारण आहे, आणि तुला पाहून छान वाटलं,असे गौतम गंभीर धोनीच्या कमेंटवर म्हणाला होता.
advertisement
दरम्यान आता बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यानंतर गौतम गंभीरने एक मुलाखत दिली होती.या मुलाखतीत गौतम गंभीरने एमएस धोनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. या मुलाखतीत धोनीच्या प्रश्नावर बोलताना गंभीर म्हणाला, खरं तर खुप चांगली गोष्ट झाली तो (धोनी) आला आणि त्याने वर्ल्ड कप पाहिला.आणि खूप भारी गोष्ट होती तो म्हणजे त्याने मला हसायला सांगितले.आता एके दिवशी धोनी माझ्या जागी असेल आणि मीही तेच लिहू शकेन. आणि तो डगआउटमधून हसू शकतो,असे गौतम गंभीर म्हणाला आहे.
advertisement
एकंदरीत गंभीरचे हे विधान पाहता आता त्याने धोनीसोबतच मागचे रुसवे फुगवे बाजुला सारून मैत्रीचा हात पुढे केलेला दिसतो.त्यामुळे त्याने धोनी पुढे टीम इंडियाचा कोच होऊन शकतो अशाप्रकारचे विधान केले होते. हे विधान पाहता आता गंभीरने धोनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे, त्यामुळे आता धोनी याला काही प्रतिसाद देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : सगळे वाद मिटले! मैत्रीचा हात पुढे करत गंभीरचं मोठं वक्तव्य, धोनी होणार टीम इंडियाचा कोच;VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement