advertisement

VIDEO : पाकिस्तानी खेळाडूंच नळावरचं भांडण, वर्ल्डकप राहिला बाजूला वाद थेट सासऱ्यांपर्यंत पोहोचला, नेमकं काय घडलं?

Last Updated:

शादाब खान जे बोलला आहे, मला नाही वाटत त्याने आपला सासऱ्याला (सकलेन मुश्ताक) असं बोलायला पाहिजे नव्हतं. सकलेन सारखा बॉलर होता, त्याने शादाब सारख्या 10 लोकांना आपल्या खिशात ठेवलं होतं.

shadab khan
shadab khan
India vs Pakistan : टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने बुधवारी नामिबियाचा पराभव करून सूपर 8 मध्ये प्रवेश केला होता. पण पाकिस्तानच्या विजयाने मात्र पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि जनता खुश दिसत नाही आहे.कारण पाकिस्तानच्या विजयानंतर खेळाडूंमध्येच नळावरच भांडण सूरू झालं आहे. विशेष म्हणजे या भांडणात एका खेळाडूच्या सासऱ्यालामध्ये खेचलं गेलं आहे.त्यामुळे वर्ल्ड कप बाजूलाच राहिला आहे आणि भलताच वाद सूरू झाला आहे.
नामिबिया विरूद्ध विजयानंतर पाकिस्तानचा स्टार खेळाडू शादाब खानने वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध 2021 मध्ये हाच संघ जिंकला होता. या विधानानंतर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू भडगला असून त्याने शादाब खानच्या सासऱ्याला मध्ये आणत त्याची इज्जत काढली आहे.
शादाब खान जे बोलला आहे, मला नाही वाटत त्याने आपला सासऱ्याला (सकलेन मुश्ताक) असं बोलायला पाहिजे नव्हतं. सकलेन सारखा बॉलर होता, त्याने शादाब सारख्या 10 लोकांना आपल्या खिशात ठेवलं होतं. 1990 आणि 2000 च्या दशकातील खेळाडूंना कुणाच्या सांगण्यावर संघात घेतलं नाही जायचं. चांगली कामगिरी केल्याशिवाय संघात संधीच मिळायाची नाही,असे दिग्गज खेळाडू बासित अलीने शादाब खानवर टीका करताना म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले. नामिबिया आली तर 4 नंबर वर खेळायला आला, 5 नंबरवर आला, पण जेव्हा भारताविरूद्ध सामना होता तेव्हा एका ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या,अशा शब्दात देखील बासित अली यांनी शादाबच्या खेळीवर सडकून टीका केली.
advertisement
advertisement
खरं तर शादाब खान याने 23 जानेवारी 2023 ला सकलेन मुश्ताक यांच्या लेकीशी विवाह केला होता. नामिबिया विरूद्ध सामना जिंकल्यानंतर शादाब खानने पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंवर टीका केली होती. या टीकेनंतर बासित अली यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनेल एआरवायवरील एका कार्यक्रमात शादाब वर हल्ला चढवला होता. "मला वाटते की पत्रकारांनी शादाब खानला त्याच्या कामगिरीबद्दल विचारले पाहिजे. जेव्हा लिंबू टींबू टीम (नामिबियाचा संदर्भ) येते तेव्हा तुम्ही खेळण्यासाठी वर जाता. तुम्ही फलंदाजी करणारा अष्टपैलू आहात की गोलंदाजी करणारा अष्टपैलू? कारण जेव्हा लिंबू टींबू टीम येते तेव्हा तुम्ही खेळण्यासाठी वर जाता कारण तुम्ही माइक हेसनचे (प्रशिक्षक) आवडते आहात.". "जर वकार (युनिस), सकलेन (मुश्ताक) किंवा इंझमाम (उल-हक) येथे असते तर मी पाहिले असते की त्याला कसे बढती मिळाली असती." हा कार्यक्रम माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकने आयोजित केला होता आणि कामरान अकमल देखील स्टुडिओमध्ये उपस्थित होता.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
भारताकडून झालेल्या 61 धावांच्या पराभवानंतर, पाकिस्तानी क्रिकेटमध्ये वक्तव्यांचा भडका उडाला होता. माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने सध्याच्या संघाची तुलना 1990 च्या दशकातील संघाशी केली आणि म्हटले की, त्या काळात पाकिस्तानचा दर्जा वेगळा होता आणि भारत त्या संघाला घाबरत होता, तर आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवर आमिरने सांगितले की, सामन्यांचे वातावरण वेगळे असायचे, पण आता भारतीय संघ पाकिस्तानला तितके गांभीर्याने घेत नाही. भारताविरुद्धच्या पराभवानंतर माजी कर्णधार शाहिदने कठोर भूमिका घेतली आणि म्हटले की, खराब कामगिरीमुळे वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचा विचार केला पाहिजे. शाहीन, बाबर आणि शादाब सारखी नावे वगळण्याचे त्यांनी स्पष्टपणे आवाहन केले.
advertisement
नामिबियाविरुद्ध शादाबने अष्टपैलू कामगिरी करून त्याला प्रत्युत्तर दिले. त्याने 36 धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या, ज्यामुळे संघाला मोठा विजय मिळाला आणि पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचला. सामन्यानंतर शादाब म्हणाला की माजी खेळाडूंना त्यांचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरी, 2021 च्या वर्ल्ड कप याच संघाने भारताला पराभूत केले. त्याने सांगितले की संघाचे खरे ध्येय केवळ एक सामना जिंकणे नाही तर विजेतेपद जिंकणे आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : पाकिस्तानी खेळाडूंच नळावरचं भांडण, वर्ल्डकप राहिला बाजूला वाद थेट सासऱ्यांपर्यंत पोहोचला, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार, 'महा-धमाका' होण्याचे संकेत; बातमीने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले
एका रात्रीत सोन्याचे भाव बदलणार,महा-धमाक्याचे संकेत; बातमीने संपूर्ण धाबे दणाणले
  • 72 तासांत सोन्याचे चित्र पालटणार

  • नवा आकडा पाहून बसेल धक्का

  • भाव असा काही वाढणार की खरेदी करणं होईल केवळ स्वप्न

View All
advertisement