IND vs PAK : 130 मिनिटांच्या बैठकीत पाकिस्तान गुडघ्यावर, ICC ने अशी काय जादू चालवली? लाहौरमध्ये काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK T20 World Cup Boycott Row : लाहौरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यात बैठक पार पडली.
IND vs PAK T20 World Cup Boycott Row : सध्या सुरू असलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचा वाद थांबल्याचं नाव घेत नाहीये. पाकिस्तानने सामना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला असताना आता आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला तंबी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गद्दाफी स्टेडियममध्ये नक्वी यांच्याशी झालेल्या बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी पीसीबीला बहिष्काराचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. अशातच काल लाहौरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
लाहौरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये बैठक
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यात बैठक पार पडली. क्वी यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) चे प्रमुख अमिनुल इस्लाम बुलबुल यांचीही भेट घेतली आणि सुरू असलेल्या वादावरचा कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मोहसिन नक्वी यांच्याशी भेट होण्यापूर्वी पीसीबी प्रमुखांचे सल्लागार अमीर मीर यांनी लाहोर विमानतळावर त्यांचे स्वागत केलं होतं.
advertisement
पीसीबीने तीन मागण्या केल्या
रविवारी लाहोरमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पीसीबीने तीन मागण्या केल्या आहेत. बांगलादेशला वाढीव भरपाई देण्यात यावी, टी-ट्वेंटी विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही बांगलादेशचे सहभाग शुल्क दिसलं जावं आणि भविष्यात आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार मिळाला, असं पीसीबीने बैठकीत मुद्दा मांडला आहे.
शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन अंतिम निर्णय
advertisement
दरम्यान, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी सोमवारी पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेतील. दोन आठवड्यांतील ही त्यांची दुसरी अधिकृत बैठक असेल. 15 फेब्रुवारीची अंतिम तारीख जवळ येत असताना परिस्थितीचे गांभीर्य यावरून दिसून येते. अशातच आता पाकिस्तान काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 7:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 130 मिनिटांच्या बैठकीत पाकिस्तान गुडघ्यावर, ICC ने अशी काय जादू चालवली? लाहौरमध्ये काय घडलं?








