advertisement

जिल्हा परिषद गट निकाल 2026 LIVE, वैजापुरात मशाल पेटली, ठाकरेंचे चार शिलेदार आघाडीवर, कुणी मारली बाजी

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result Live: वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होत असून, युती फिसकल्यानंतर निर्माण झालेल्या थेट संघर्षामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

वैजापूर तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी राजकीय हालचाली
वैजापूर तालुक्यात ZP–PS मतमोजणीसाठी राजकीय हालचाली
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result Live: वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. युती फिसकटल्यानंतर निर्माण झालेल्या थेट संघर्षामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. वैजापूरमध्ये शिवसेना (शिंदे गट) चे आमदार रमेश बोरनारे आणि भाजप–राष्ट्रवादी युतीचे नेतृत्व करणारे डॉ. दिनेश परदेशी यांच्यातील संघर्षामुळे ही निवडणूक तालुक्यातील प्रतिष्ठेची ठरली आहे. निकाल LIVE अपडेट होत आहेत.
सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या अर्ध्या तासात वैजापूर मशाल पेटल्याचं दिसत आहे. वैजापूर तालुक्यात ठाकरे सेनेचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण गायके, संजय निकम, पद्मबाई शिंदे आणि कल्याणी मिसाळ यांनी आघाडी घेतली आहे.
वैजापूरमधील प्रमुख राजकीय लढत
वैजापूर तालुक्यात शिवसेना–शिंदे गट विरुद्ध भाजप–राष्ट्रवादी युती अशी थेट लढत दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीतील भाजप–राष्ट्रवादी यशानंतर तीच रणनीती जिल्हा परिषदेत राबवण्यात आली असून त्यामुळे सत्ताधारी गटासाठी आव्हान वाढलं आहे.
advertisement

वैजापूर पंचायत समितीतील हाय होल्टेज लढती

बोरसर, वांजरगाव, शिऊर या तिन्ही गटांमध्ये आमदार रमेश बोरनारे यांचे निकटवर्तीय शिलेदार रिंगणात उतरले असल्याने, भाजप–राष्ट्रवादी युतीने खास रणनीती आखत तगडे उमेदवार उभे केले आहेत. या गटांतील निकाल बोरनारेंसाठी प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. ग्रामीण भागात बोरनारे गटाचे पारंपरिक वर्चस्व आहे, तर शहरी व निमशहरी भागात भाजप–राष्ट्रवादी युतीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे.
advertisement

पक्षनिहाय प्राथमिक चित्र

शिवसेना (शिंदे गट):  04
भाजप: 00
राष्ट्रवादी काँग्रेस: 00
अपक्ष / इतर: 00
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिल्हा परिषद गट निकाल 2026 LIVE, वैजापुरात मशाल पेटली, ठाकरेंचे चार शिलेदार आघाडीवर, कुणी मारली बाजी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement