IPL 2026 : आता टॉस ठरवणार नाही मॅचचा विनर... आयपीएलचा रूल बदलला, काय आहे नवा नियम?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे, पण त्याआधीच आयपीएलच्या नियमांमध्ये सगळ्यात मोठा बदल झाला आहे. या नियमामुळे आता टॉसवर मॅचचा निकाल लागण्याला आळा बसणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे, पण त्याआधीच आयपीएलच्या नियमांमध्ये सगळ्यात मोठा बदल झाला आहे. या नियमामुळे आता टॉसवर मॅचचा निकाल लागण्याला आळा बसणार आहे. आयपीएलच्या डे-नाईट सामन्यांमध्ये सगळ्याच टीमचे कर्णधार टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेत होते, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये दवामुळे बॉलिंग करणं बॉलरना कठीण जात होतं, त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जात होतं.
बॉलचा नियम बदलला
टॉसवरच मॅचचा निकाल निश्चित होत असल्यामुळे आता आयपीएलने नवा नियम आणला आहे. डे-नाईट सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करणारी टीम 10 ओव्हरनंतर बॉल बदलून मागू शकते. दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त एकदाच कर्णधाराला बॉल बदलण्याची मागणी करता येईल. दव असलं किंवा नसलं तरीही बॉलिंग टीमचा कर्णधार अंपायरकडे बॉल बदलण्याची मागणी करू शकतो.
advertisement
दुसऱ्या इनिंगमध्ये 10 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर बॉलिंग टीमचा कर्णधार बॉल बदलण्याची विनंती अंपायरकडे करू शकतो, पण बॉल ओव्हरच्या मध्ये नाही तर ओव्हर संपल्यानंतरच बदलला जाईल, असं आयपीएलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बॉलिंग टीमला 10 ओव्हरनंतर नवा बॉल मिळणार नाही, तर 10 ओव्हर वापरलेला तसाच दुसरा बॉल दिला जाईल. तसंच हा नियम फक्त दुसऱ्या इनिंगमध्ये आणि डे-नाईट मॅचसाठीच असेल.
advertisement
आता टॉस महत्त्वाचा ठरणार नाही?
बीसीसीआय आणि आयपीएलचा हा नियम सामन्यामध्ये टॉसचं महत्त्व कमी करेल. 10 ओव्हरनंतर बॉलिंग टीमला जो दुसरा बॉल मिळेल त्यावर दव लागलं नसेल, म्हणजेच बॉल ओला नसेल, त्यामुळे बॉलरला बॉलिंग करण्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसंच मॅचचा निकालही दव ठरवणार नाही.
आयपीएल कधी सुरू होणार?
advertisement
आयपीएल 2026 चा मोसम शनिवार 28 मार्चपासून सुरू होणार आहे. मोसमाचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होईल, तर रविवारी मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकांमुळे आयपीएल 2026 च्या फक्त 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये 12 एप्रिलनंतरच्या उरलेल्या सामन्यांचं वेळापत्रक घोषित केलं जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 5:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : आता टॉस ठरवणार नाही मॅचचा विनर... आयपीएलचा रूल बदलला, काय आहे नवा नियम?








