Kuldeep Yadav : 'दो है घर लेकर जायेंगे का...', DRS वरून कुलदीपने खेचले हिटमॅनचे कान, मॅचनंतर सांगितलं मैदानात काय घडलं?

Last Updated:

Kuldeep Yadav On Rohit Sharma DRS Review : रोहित नेहमी मला नकार देतो आणि मी नेहमी त्याला म्हणतो की, घेऊन टाक राव.. असं कुलदीप यादव म्हणाला.

Kuldeep Yadav On Rohit Sharma DRS Review
Kuldeep Yadav On Rohit Sharma DRS Review
Kuldeep Yadav on DRS Review : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव हा त्याच्या डीआरएस कॉलसाठी अनेकदा कुप्रसिद्ध असतो. शनिवारी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात मजेशीर घटना पहायला मिळाली. क्विंटन डी कॉकच्या शतकानंतर पाहुण्या संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कुलदीप यादवने चार विकेट घेत सामना उलटला. यावेळी कुलदीपच्या अपिलने सर्वांनाच हसायला आलं.
कुलदीपने पहिल्या दोन विकेटनंतर वारंवार अपील केलं. त्यावर रोहित शर्माला देखील हसू आवरलं नाही. रोहित म्हणत होता, आऊट नाहीये बाहेर जातोय बाहेर जातोयय... माघारी जा, माघारी जा... तर मी त्यांना म्हणत होतो, दोन विकेट आहेत घरी घेऊन जाणारे का? त्यानंतरही त्याने घेण्यास नकार दिला. जेव्हा अंपायरने आऊट दिलं तेव्हा मला देखील वाटलं की नक्कीच वरती बॉल लागला आहे. तेव्हा मलाही वाटलं होतं की, अंपायर्स कॉल असेल. रोहित नेहमी मला नकार देतो आणि मी नेहमी त्याला म्हणतो की, घेऊन टाक राव.. असं कुलदीप यादव म्हणाला.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Badal Raj (@badal_babu86598)



advertisement
टीमसाठी दोन डीआरएस असतात आणि मला वाटतं की, त्यातला एक माझा आहे, असं म्हणत कुलदीपने ऋषभसोबत हशा पिकवला. बॉलर म्हणून नेहमी वाटतं की आऊट आहे. पण विकेटकीपरला जास्त कळतं. डीआरएसच्या बाबतीत मी खूप खराब आहे. रोहित भाई नेहमी क्लियर बोलतो, तुला काय वाटतं लाईन नीट आहे की नाही? त्यामुळे अनेक निर्णय बरोबर होतात, असंही कुलदीप यादव म्हणाला.
advertisement
दरम्यान, पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना कुलदीप यादवने रोहित शर्माचा उल्लेख बोलता बोलता कॅप्टन म्हणून केला. पण नंतर चूक लक्षात आल्यावर त्याने केएल राहुलचं नाव घेतलं अन् त्याचं कौतूक केलं अन् रोहित शर्माचा उल्लेख माजी कॅप्टन म्हणून केला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kuldeep Yadav : 'दो है घर लेकर जायेंगे का...', DRS वरून कुलदीपने खेचले हिटमॅनचे कान, मॅचनंतर सांगितलं मैदानात काय घडलं?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय
  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

View All
advertisement