MI vs KKR : रोहित शर्मा का नाही Impact subs, फिटनेस नाही हे आहे मोठे सिक्रेट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट सब न बनवता त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला बनवलं आहे.
MI vs KKR, IPL 2026 : आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स भिडणार आहे. या सामन्याला सूरूवात झाली आहे. या सामन्याच्या टॉस दरम्यान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोलकत्ता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट सब बनवलं नाही आहे. मात्र गेल्या वर्षी रोहित शर्मा संपूर्ण हंगामात इम्पॅक्ट सब होता.पण यावर्षी त्यांना इम्पॅक्ट सब का बनवलं नाही आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला इम्पॅक्ट सब न बनवता त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला बनवलं आहे.त्याचं झालं असं की मागच्या हंगामात रोहित शर्माला संपू्र्ण हंगामात इम्पॅक्ट सब बनवलं होतं. पण मुंबईची ही स्ट्रेटेजी फारशी चालली नाही.त्यामुळे यावर्षी स्ट्रेटेजी बदलून रोहित शर्मा थेट खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता तुम्हाला वाटलं असेल गेल्या वर्षी रोहित शर्मा हा फिट नव्हता. पण यावर्षी रोहित शर्मा हा चांगलाच फिट झाला आहे.त्यामुळे कदाचित त्याला इम्पॅक्ट सब बनवलं नसले. पण तसे अजिबात नाही आहे. इम्पॅक्ट सब न बनवण्या मागच कारण वेगळं आहे. मागच्या वर्षी रोहित शर्मा हा इम्पॅक्ट सब होता.पण त्याच्या फलंदाजी व्यतिरीक्त मुंबईला त्याचा फारसा वापर करता आला नाही. खरं तर त्याच्याकडे जितका अनुभव आहे,त्या अनुभवाचा फायदा उचलणे अपेक्षित होते, ते मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी केलेच नव्हते. त्यामुळे मुंबई फायनल गाठू शकली नव्हती.
advertisement
हीच गोष्ट लक्षात ठेवून यंदा मुंबई इंडियन्सने त्याला इम्पॅक्ट सब बनवलं नाही. त्यात आता त्याची फिटनेस खूपच जबरदस्त आहे.त्यामुळे मैदानात तो पुर्ण वेळ अॅक्टीव्ह राहू शकतो.तसेच प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध रणनिती आखण्यासाठी रोहित शर्माला हार्दिक पांड्यासाठी चांगला मदतगार ठरू शकतो.त्यामुळेच मुंबईने त्याला मोकळं सोडलं आहे. त्यामुळेच रोहितला इम्पॅक्ट सब बनवलं नाही आहे.
कोलकाता नाइट राइडर्स (प्लेइंग इलेवन):
फिन एलन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कैमरून ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रिंकू सिंह, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, ब्लेसिंग मुजरबानी
advertisement
मुंबई इंडियंस (प्लेइंग इलेवन):
रोहित शर्मा, रयान रिकेलटन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकुर, मयंक मारकंडे, एएम ग़ज़नफ़र, ट्रेंट बोल्ट, जसप्रित बुमराह
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 7:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs KKR : रोहित शर्मा का नाही Impact subs, फिटनेस नाही हे आहे मोठे सिक्रेट







