Papa Karkhanis : रोहित शर्मा नावाच्या हिऱ्याला पारखणारा जोहरी काळाच्या पडद्याआड, कोण होते पापा कारखानीस?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबईचे माजी विकेट कीपर बॅटर विजय उर्फ 'पापा' कारखानीस यांचे रविवारी सकाळी बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
मुंबई : मुंबईचे माजी विकेट कीपर बॅटर विजय उर्फ 'पापा' कारखानीस यांचे रविवारी सकाळी बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. पापा कारखानीस 86 वर्षांचे होते. पापा कारखानीस स्थानिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध शिवाजी पार्क जिमखाना आणि सेंट्रल बँकेकडून खेळले. धडाकेबाज बॅटर आणि उत्कृष्ट विकेट कीपर अशी पापा कारखानीस यांची ओळख होती. पापा कारखानीस 60 च्या दशकामध्ये मुंबईकडून 7 प्रथम श्रेणी सामने खेळले. याशिवाय पापा कारखानीस शिवाजी पार्क जिमखान्याकडून तब्बल दोन दशकं खेळले, या टीममध्ये मुंबईने भारताला दिलेले अनेक महान खेळाडू होते.
पापा कारखानीस हे महान बॅटर सुनिल गावसकर यांचे जवळचे मित्र होते. 'पापा टीममधील सगळ्यांचा आवडता खेळाडू होता. 14 मे रोजी माझ्या वार्षिक मेळाव्यात मी त्यांना भेटणार होतो, पण तो सोहळा पुढे ढकलण्यात आला होता', अशी प्रतिक्रिया सुनिल गावसकर यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना दिली.
भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा याची प्रतिभा सुरूवातीलाच ओळखणाऱ्या काही प्रशिक्षकांपैकी एक पापा कारखानीस होते. रोहित 14 वर्षांचा होता, तेव्हा त्याची बोरिवली सेंटरमधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी शिबिरासाठी निवड झाली, त्यावेळी पापा कारखानीस तिथे प्रशिक्षक होते. रोहितचं मुंबईसाठीचं भविष्य उत्तम आहे, असं पापा कारखानीस यांनी तेव्हाच सांगितलं होतं. 'पापा कारखानीस खूपच प्रेमळ स्वभावाचे होते, त्यांच्या जाण्याने मी खूप दु:खी आहे', अशी प्रतिक्रिया रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिली आहे.
advertisement
45 दिवस कोरोनासोबत लढले कारखानीस
ऑक्टोबर 2020 मध्ये वयाच्या 80व्या वर्षी पापा कारखानीस यांना कोरोनाची लागण झाली होती. तब्बल 45 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पापा कारखानीस यांनी कोरोनाला यशस्वीपणे मात दिली होती. 1967-68 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मद्रासविरुद्ध कारखानीस यांनी 52 आणि 43 रनच्या महत्त्वाच्या खेळी केल्या, ज्यामुळे मुंबईने सलग दहाव्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 18, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Papa Karkhanis : रोहित शर्मा नावाच्या हिऱ्याला पारखणारा जोहरी काळाच्या पडद्याआड, कोण होते पापा कारखानीस?