T20 वर्ल्ड कपआधी 'कॅप्टन'च्या घरावर दु:खाचा डोंगर, 13 वर्षांच्या भावाचं निधन
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपआधीच आंतरराष्ट्रीय टीमच्या कर्णधाराच्या घरात दुःखाचा डोंगर पसरला आहे. या कर्णधाराच्या 13 वर्षांच्या भावाचं निधन झालं आहे.
मुंबई : 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, पण या वर्ल्ड कपआधीच आंतरराष्ट्रीय टीमच्या कर्णधाराच्या घरात दुःखाचा डोंगर पसरला आहे. या कर्णधाराच्या 13 वर्षांच्या भावाचं निधन झालं आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याचा भाऊ मोहम्मद महदी याचं निधन झालं आहे. सिकंदरचा भाऊ हा फक्त 13 वर्षांचा होता. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून सिकंदर रझाच्या मृत्यूची बातमी शेअर केली आहे.
'झिम्बाब्वेच्या टी-20 टीमचा कर्णधार सिकंदर रझा आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना. रझाचा धाकटा भाऊ मोहम्मद महदी याचं अकाली निधन झालं आहे. महदी हा जन्मापासूनच हिमोफिलियाने ग्रस्त होता. आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्याचं निधन झालं आहे', अशी पोस्ट झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने केली आहे.
सिकंदर रझाची भावनिक पोस्ट
30 डिसेंबर 2025 ला हरारे येथील वॉरेन हिल्स दफनभूमीमध्ये मोहम्मद महदीचे दफन करण्यात आले. झिम्बाब्वे क्रिकेटच्या पोस्टवर सिकंदर रझाने तुटलेल्या हृदयाचा इमोजी शेअर केला आहे.
advertisement
सिकंदर रझाची कारकिर्द
सिकंदर रझा हा सध्याच्या झिम्बाब्वेच्या टीममधील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. झिम्बाब्वेसाठी त्याने एकूण 22 टेस्ट, 153 वनडे आणि 127 टी-20 सामने खेळले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये, रझाने झिम्बाब्वेसाठी 1434 रन केल्या आणि 40 विकेट घेतल्या आहेत. शिवाय, त्याने वनडेमध्ये 4,476 रन आणि 94 विकेट घेतल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये सिकंदर रझाने 2883 रन आणि 102 विकेट घेतल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपआधी 'कॅप्टन'च्या घरावर दु:खाचा डोंगर, 13 वर्षांच्या भावाचं निधन










