Suryakumar Yadav : टीम इंडियाकडून चूक कुठं झाली? पराभवाला जबाबदार कोण? कोमजलेल्या चेहऱ्याने सूर्याने सगळंच सांगितलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Statement :बॅटिंगबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, 180 पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच मॅच जिंकता येत नाही, पण तिथं ती नक्कीच गमावली जाऊ शकते.
India vs South Africa : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतरही सकारात्मक गोष्टी स्विकारल्या आहेत. मॅचच्या सुरुवातीला आपण पूर्णपणे खेळात होतो, असं सूर्याचं मत आहे. सुरुवातीला बॉलरनी शानदार कामगिरी करत 21 रन्सवर 3 विकेट्स घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर 7 ते 15 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी अप्रतिम बॅटिंग केल्याने मॅच फिरली, अशी प्रांजळ कबुली सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये दिली.
पॉवरप्लेमध्येच मॅच जिंकता येत नाही
बॅटिंगबद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, 180 पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच मॅच जिंकता येत नाही, पण तिथं ती नक्कीच गमावली जाऊ शकते. आम्ही पॉवरप्लेमध्येच खूप जास्त विकेट्स गमावल्या, ज्यामुळे आमचा पाया डळमळीत झाला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या पार्टनरशिप्सची गरज होती, त्या आम्हाला मैदानावर रचता आल्या नाहीत.
advertisement
बुमराह अन् अर्शदीपचं कौतुक
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या बॉलिंग जोडीचे सूर्याने भरभरून कौतुक केले. या दोघांचे कॉम्बिनेशन अत्यं अचूक असून त्यांनी मिळून 8 ओव्हरमध्ये साधारण 5 विकेट्स घेतल्या. हे दोन्ही अनुभवी बॉलर टीमसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांनी आज पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. त्यांच्यातील हीच भागीदारी आम्हाला पुढच्या मॅचमध्येही अपेक्षित असल्याचे कॅप्टनने नमूद केले.
advertisement
कोणताही मोठा बदल नाही
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी मॅचबद्दल विचारले असता, सूर्याने सांगितले की प्लॅन्समध्ये कोणताही मोठा बदल केला जाणार नाही. आम्ही आमचा आक्रमक क्रिकेटचा ब्रँड कायम ठेवणार आहोत. चांगली बॅटिंग, सधी बॉलिंग आणि चुस्त फिल्डिंग या तीन गोष्टींवरच आमचा भर असेल. प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहित असून, आम्ही पुन्हा एकदा जोमाने कमबॅक करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
advertisement
चुकांची समीक्षा करू
दरम्यान, शेवटी सूर्याने स्पष्ट केले की, हा पराभव म्हणजे आमच्यासाठी शिकण्याची एक संधी आहे. आम्ही शांतपणे बसून झालेल्या चुकांची समीक्षा करू आणि अधिक ताकदीने मैदानात उतरू. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम आता पूर्णपणे सज्ज असून, आगामी मॅचमध्ये मैदानावरील आमचा खेळ प्रभावी दिसेल. या विजयासाठी खेळाडूंना आता केवळ बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असंही सूर्या म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 8:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : टीम इंडियाकडून चूक कुठं झाली? पराभवाला जबाबदार कोण? कोमजलेल्या चेहऱ्याने सूर्याने सगळंच सांगितलं










