advertisement

Thane News : महत्त्वाची बातमी, टीएमटी बस भाड्यात मोठी वाढ होणार; कधी पासून निर्णय लागू?

Last Updated:

TMT Bus Fare Increase : ठाणेकरांनो आता तुमचे बजेट कोलमडणार आहे लवकरच बसने प्रवास करताना तिकीटासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. मात्र हा निर्णय कधी पासून लागू करण्यात येणार आहे त्याबाबत जाणून घ्या.

Steep Rise in TMT Bus Ticket Prices Expected;
Steep Rise in TMT Bus Ticket Prices Expected;
ठाणे : ठाणे शहरात नागरिकांच्या दळणवळणाचे मुख्य साधन हे टीएमटीच्या बसेस आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने याचा वापर करत असतात. मात्र आता टीएमटीच्या बाबतीत एक मोठी अपडेट आलेली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा संताप होण्याची शक्यता आहे.
बस प्रवास आता 'स्वस्त' उरला नाही
सध्याची वाढती महागाई तसेच इंधनाच्या दरातील सततचे चढ-उतार आणि वाढलेला खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका यांच्या वाहतूक सेवेवर मोठा आर्थिक ताण आला आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी तब्बल 11 वर्षांनंतर बस भाडे वाढवण्याचा गंभीर विचार सुरू झाला आहे. यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी प्रशासन करत आहे.
advertisement
टीएमटीसमोर मोठे आर्थिक आव्हान
सध्या ठाणे परिवहन सेवेचे वार्षिक उत्पन्न सुमारे 90 ते 95 कोटी रुपये आहे. मात्र बसेस चालवण्यासाठी एकूण खर्च 350 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये बस देखभालीसाठी 150 कोटी,ई-बस प्रकल्पासाठी 50 कोटी तसेच वीज, इंधन आणि दुरुस्तीचा खर्च एकत्र आहे. वाढत्या मनुष्यबळाच्या खर्चामुळे आणि जुन्या दररचनेमुळे दर्जेदार सेवा देणे कठीण झाले आहे.
advertisement
सध्या ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी) च्या ताफ्यात 407 बसेस आहेत. त्यापैकी 380 बसेस दररोज धावतात आणि सुमारे 2.45 लाख प्रवाशांना सेवा देतात. दररोज जवळपास 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते पण विविध सवलतींमुळे 5 ते 6 लाख रुपयांचा महसूल कमी होतो.
शेवटची वाढ 2015 मध्येच
शेवटची भाडेवाढ 2015 मध्ये झाली होती उलट 2023 मध्ये एसी बसच्या भाड्यात 40 ते 50 टक्के कपात करण्यात आली होती. मात्र वाढत्या तोट्यामुळे आता भाडेवाढ हा शेवटचा उपाय असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : महत्त्वाची बातमी, टीएमटी बस भाड्यात मोठी वाढ होणार; कधी पासून निर्णय लागू?
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement