IND vs PAK सामन्याआधीच राडा, पत्रकार परिषदेत सुर्याने पाकिस्तानला छेडलं, 'मैदानावर आम्ही आक्रमक...' VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आजपासून आशिया कपला सूरूवात झाली आहे.या स्पर्धेआधी सर्व खेळाडूंची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
Suryakumar Yadav on Pakistan Asia Cup 2025 : आजपासून आशिया कपला सूरूवात झाली आहे.या स्पर्धेआधी सर्व खेळाडूंची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. आम्ही मैदानावर आक्रमकपणे खेळणारच. मला वाटत नाही त्याशिवाय मी खेळू शकतो,असा इशारा सुर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिला आहे.
खरं तर पत्रकार परिषदे दरम्यान एका पत्रकारने सुर्यकुमारला विचारलं की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आहे.अशात भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ पहिल्यांदाच मैदानावर आमने सामने येणार आहेत. अशापरिस्थितीत तुम्ही तुमच्या खेळाडूंना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता सल्ला देणार आहात का? या प्रश्नावर सुर्याने थेट पाकिस्तानला छेडलं आहे.
Question to Suryakumar Yadav & Salman Ali Agha:
Considering the recent situation between the two countries, do you think that there is a need to give specific instructions to the players to keep their tempers in control?
Answers👇#AsiaCup2025 pic.twitter.com/VqQ8voZWla
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) September 9, 2025
advertisement
आम्ही जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा आमच्यात आक्रमकता नेहमीच असते.आक्रमकतेशिवाय, मला वाटत नाही की तुम्ही हा खेळ खेळू शकतो,असा इशारा सुर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा सुर्यकुमार यादवच्या आक्रमकतेच्या विधानावर म्हणाला, जोपर्यंत भावना मैदानापुरती मर्यादित आहे आणि मैदानाबाहेर नाही तोपर्यंत तो त्याच्या खेळाडूंना आक्रमक होण्यापासून रोखणार नाही,असे सलमान आघाने सांगितलं.
advertisement
तसेच तुम्हाला कोणत्याही खेळाडूला काहीही सांगण्याची गरज नाही.प्रत्येकजण वैयक्तिकरित्या खूप वेगळा असतो. जर एखाद्याला मैदानावर आक्रमक व्हायचे असेल तर ते तसे करण्यास स्वागतार्ह आहेत. जेव्हा वेगवान गोलंदाजांचा विचार केला जातो तेव्हा ते नेहमीच आक्रमक असतात आणि तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही.हेच त्यांना पुढे नेत राहते.त्यामुळे माझ्याकडून कोणालाही सूचना नाहीत,जोपर्यंत ते मैदानावर राहतात असे आघाने सांगितले.
advertisement
तसेच भारत पहिल्या सामन्यात प्रयोग करण्याचा विचार करेल का असे विचारले असता, सूर्यकुमारने नकारार्थी उत्तर दिले.जेव्हा तुम्ही एखादा फॉर्मेट खेळता तेव्हा तुम्हाला तुमची तयारी किती चांगली आहे हे माहित असणे आवश्यक आहे. जे तुटलेले नाही ते का दुरुस्त करावे? जर एखाद्या गोष्टीने आपल्याला निकाल दिले असतील तर आपल्याला तो पैलू स्वतंत्रपणे बदलण्याची आवश्यकता का आहे? असेही शेवटी तो म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान येत्या रविवारी 14 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे.या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षीत राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्याआधीच राडा, पत्रकार परिषदेत सुर्याने पाकिस्तानला छेडलं, 'मैदानावर आम्ही आक्रमक...' VIDEO