T20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने इतिहास घडवला, 19 वर्षात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपमध्ये नवा इतिहास लिहिला आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा 10 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.
चेन्नई : न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपमध्ये नवा इतिहास लिहिला आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा 10 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. युएईने दिलेलं 174 रनचं आव्हान न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता पार केलं. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमने एकही विकेट न गमावता इतक्या रनचं आव्हान यशस्वी पार केलं आहे. याशिवाय टी-20 वर्ल्ड कपमधली ही कोणत्याही विकेटसाठीची सगळ्यात मोठी पार्टनरशीपही ठरली.
न्यूझीलंडने 174 रनचं आव्हान 15.2 ओव्हरमध्ये पार केलं. टीम सायफर्टने 42 बॉलमध्ये 211.90 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 89 रन केले, ज्यात 12 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय फिन ऍलनने 50 बॉलमध्ये 168 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 84 रन केले. ऍलनने त्याच्या इनिंगमध्ये 5 फोर आणि 5 सिक्स मारले.
advertisement
या सामन्यात युएईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांना 20 ओव्हरमध्ये 173/6 पर्यंत मजल मारता आली. कर्णधार मोहम्मद वसीमने 45 बॉलमध्ये 66 आणि आलिशान शरफूने 47 बॉलमध्ये 55 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. याशिवाय जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्स यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या 2 सामन्यांमधला न्यूझीलंडचा हा दुसरा विजय आहे. याआधी न्यूझीलंडने अफगाणिस्तानचाही पराभव केला होता. लागोपाठ दुसरा विजय मिळवताच न्यूझीलंड सुपर-8 च्या आणखी जवळ पोहोचली आहे. ग्रुप डी मध्ये असलेली न्यूझीलंड 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवल्यामुळे 4 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे ग्रुप स्टेजमधले उरलेले 2 सामने शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 17 फेब्रुवारीला कॅनडाविरुद्ध आहे. या दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवूनही न्यूझीलंड सुपर-8 मध्ये प्रवेश करेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 6:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने इतिहास घडवला, 19 वर्षात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं!








