T20 World Cup : पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट... शाहिन आफ्रिदी-बाबरमध्ये काय झालं? ड्रेसिंग रूममध्ये सगळेच बिथरले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 2 विकेटने विजय झाला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 2 विकेटने विजय झाला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचं सेमी फायनलला पोहोचणं कठीण झालं आहे, त्यातच त्यांच्या टीममधले वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शाहिन आफ्रिदीला बाबरबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर आफ्रिदीने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाकिस्तान टीममध्ये फूट
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करताना पाकिस्तानने 164 रन केले, या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था खराब झाली होती, पण कर्णधार हॅरी ब्रुकच्या शतकामुळे इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. भर पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीने बाबर आझमच्या बॅटिंगवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
advertisement
शाहिन आफ्रिदीला बाबर आझमच्या पार्टनरशीपबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा 'टी-20 क्रिकेटमध्ये पार्टनरशीप करताना तुम्हाला मोठा शॉट मारल्यानंतर एक-दोन रन काढाव्या लागतात, त्यामुळे प्रत्येक ओव्हरला 8-9 रन येतील', असं शाहिन आफ्रिदी म्हणाला आहे. शाहिन आफ्रिदीचं हे वक्तव्य म्हणजे बाबर आझमवर निशाणा असल्याचं बोललं जात आहे, कारण बाबरने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन 24 बॉलमध्ये 25 रनची संथ खेळी केली, ज्यावरून त्याच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
advertisement
SHAHEEN AFRIDI CRITICISE BABAR AZAM INNING.
Q ️-Babar was building a partnership,but after he got out
Shaheen️ - A partnership means you need someone to hit boundaries & rotate strike. In T20, you need eight runs over. pic.twitter.com/RQATX74Hin
— Sam (@Cricsam01) February 25, 2026
advertisement
या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाबर आझमला संघर्ष करावा लागत आहे. बाबर आझमने या टी-20 वर्ल्ड कपच्या 4 इनिंगमध्ये 22.75 ची सरासरी आणि 112.34 च्या स्ट्राईक रेटने 91 रन केले आहेत, ज्यात 46 रन हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. या कामगिरीनंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून बाबरला टीममधून बाहेर करण्याची मागणीही केली जात आहे.
advertisement
पाकिस्तान सेमी फायनलआधीच घरी?
पाकिस्तानच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सुपर-8 चा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळाला. आता सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला न्यूझीलंडवर अवलंबून राहावं लागणार आहे.
न्यूझीलंडचे दोन सामने हे श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध शिल्लक आहेत, या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव व्हावा यासाठी पाकिस्तानला प्रार्थना करावी लागणार आहे, त्याशिवाय पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे, तरच पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाता येईल.
advertisement
न्यूझीलंडने त्यांच्या 2 पैकी 1 सामना जिंकला आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला तसंच पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे समसमान म्हणजेच 3-3 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये ज्या टीमचा नेट रनरेट जास्त आहे, ती टीम सेमी फायनलला प्रवेश करेल. या ग्रुपमधून इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवून सेमी फायनल गाठली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट... शाहिन आफ्रिदी-बाबरमध्ये काय झालं? ड्रेसिंग रूममध्ये सगळेच बिथरले!









