advertisement

T20 World Cup : मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर टाकली होती कार, भारत-USA मॅच खेळलेल्या खेळाडूचा स्टेशनवर ड्रामा!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने युएसएचा 29 रननी पराभव केला. या सामन्यात खेळलेल्या खेळाडूला मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती.

मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर टाकली होती कार, भारत-USA मॅच खेळलेल्या खेळाडूचा स्टेशनवर ड्रामा!
मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर टाकली होती कार, भारत-USA मॅच खेळलेल्या खेळाडूचा स्टेशनवर ड्रामा!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने युएसएचा 29 रननी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या 49 बॉलमध्ये नाबाद 84 रन मुळे टीम इंडिया अडचणीतून बाहेर आणि स्पर्धेची सुरूवात विजयाने केली. या सामन्यात युएसएकडून खेळणाऱ्या खेळाडूला मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. हरमीत सिंगने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलला हरमीतने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बॅटिंगमध्ये मात्र हरमीत पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.

हरमीत सिंगला अटक

फेब्रुवारी 2017 मध्ये हरमीत सिंगला याला मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गाडी चालवल्याबद्दल आरपीएफने हरमीतला अटक केली होती. 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास हरमीतने अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कार चालवली होती, त्यामुळे काही काळ प्लॅटफॉर्मवर गोंधळ निर्माण झाला. प्लॅटफॉर्मवर गर्दी नसल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.
advertisement
'आपण वांद्र्यामध्ये मित्राला सोडले आणि घरी परत जात असताना आपण चुकीचा टर्न घेतला. आपण शहरामध्ये नवीन आहोत', असं हरमीतने त्यावेळी पोलिसांना सांगितलं होतं.

कोण आहे हरमीत सिंग?

हरमीत सिंग हा भारताकडून 2012 सालच्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये खेळला, तसंच तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि जम्मू-काश्मीरच्या टीममध्येही होता. आयपीएलमध्ये हरमीतला राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं होतं, पण भारतामध्ये क्रिकेटच्या फार संधी मिळत नसल्यामुळे तो अमेरिकेमध्ये गेला आणि आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध ज्या मुंबईत अटक झाली तिथेच खेळला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर टाकली होती कार, भारत-USA मॅच खेळलेल्या खेळाडूचा स्टेशनवर ड्रामा!
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement