एक मेसेज अन् फ्लाईट पकडलं, 5 तासांची सिक्रेट मीटिंग, पाकिस्तानच्या डर्टी गेममध्ये बांगलादेश कसं आलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, त्यानंतर रविवारी रात्री लाहोरमध्ये आयसीसी, पीसीबी आणि बांगलादेशच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली.
लाहोर : पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, त्यानंतर रविवारी रात्री लाहोरमध्ये आयसीसी, पीसीबी आणि बांगलादेशच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. पण या बैठकीला बांगलादेश का आलं? असा प्रश्न अनेकांना पडला. शनिवार आणि रविवारी रात्री 1 वाजता बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल हे ढाक्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान पकडण्याच्या तयारीत होते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संचालकांना बुलबुल यांच्या अनपेक्षित प्रवासाची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर मिळाली. अमिनुल इस्लाम बुलबुल लाहोरला रवाना झाल्याचा हा मेसेज होता.
बांगलादेशी वृत्तपत्र प्रथम आलोनुसार, बुलबुल यांनी मेसेजमध्ये लिहिले आहे की, 'ही ट्रिप फक्त 90 मिनिटांपूर्वीच कन्फर्म झाली होती. मी सध्या विमानतळावर आहे. इतक्या कमी वेळात मी कोणालाही फोन करू शकलो नाही. ही बैठक 8 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या वेळेनुसार दुपारी 4 वाजता होईल. मी 9 फेब्रुवारीच्या संध्याकाळी परत येईन."
जरी या मेसेजमुळे बुलबुल लाहोरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी, त्यांच्या स्वतःच्या बोर्ड सदस्यांनाही या ट्रिपचा उद्देश माहित नव्हता. टी-20 वर्ल्ड कपमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुलबुल पाकिस्तानला गेले. बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानने कोलंबोमध्ये भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ हा निर्णय घेतला होता. त्यानंतर लाहोरमध्ये आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ची बैठक महत्त्वाची ठरली. या बैठकीत अमिनुल इस्लाम बुलबुलची उपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत होती.
advertisement
बुलबुल पाकिस्तानच्या समर्थनार्थ तिथे होते का? वाटाघाडी करण्यासाठी बुलबुल बैठकीला आले होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
झूमद्वारे अनेक लोक बैठकीत सामील झाले असले तरी, बैठकीचा अजेंडा बांगलादेशपेक्षा पाकिस्तानशी अधिक संबंधित असतानाही, बीसीबी प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी लाहोरला जाण्याची आवश्यकता का वाटली? हे देखील आश्चर्यकारक होते. खासकरून बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा वर्ल्ड कपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
advertisement
बांगलादेश क्रिकेट अध्यक्ष का आले?
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमीनुल इस्लाम बुलबुल रविवारी लाहोरमध्ये पोहोचले, जिथे त्यांचे पीसीबीचे सीईओ सलमान नसीर यांनी स्वागत केले. पीसीबीने सोशल मीडियावर त्यांचे स्वागत करणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला.
सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने भारतात प्रवास करण्यास नकार दिल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळण्यास नकार दिला होता. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या पाठिंब्याने, बांगलादेशने आयसीसीला त्यांचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती.
advertisement
आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली, त्यानंतर बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला आणि स्कॉटलंडचा समावेश केला. यामुळे वाद आणखी वाढला.
5 तासांची सिक्रेट मीटिंग
लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात सुमारे 5 तास बैठक झाली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतरच भारताविरुद्ध सामना खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं पाकिस्तानने आयसीसीला सांगितलं.
advertisement
पाकिस्तानने ठेवल्या 3 अटी
1 आयसीसीच्या महसुलात मोठा वाटा
2 भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करणे
3 खेळाडूंमध्ये हस्तांदोलन अनिवार्य करणे
समोर आलेल्या वृत्तानुसार, बुलबुल आणि पीसीबी प्रमुख नक्वी यांच्यात एक स्वतंत्र वैयक्तिक बैठकही झाली.
बांगलादेश बैठकीत का?
बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असला तरी, लाहोर बैठकीत त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. बीसीबीने सातत्याने पाकिस्तानच्या भूमिकेवर ठाम राहून ही उपस्थिती पाकिस्तानची सौदेबाजी करण्याची क्षमता वाढवणारी मानली जाते.
advertisement
भारत-पाकिस्तान सामना हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सामन्यांपैकी एक आहे. प्रसारण, प्रायोजकत्व आणि जाहिरातींद्वारे आयसीसीला अब्जावधी रुपये मिळतात. याचा बांगलादेशसारख्या छोट्या मंडळांच्या वार्षिक उत्पन्नावरही परिणाम होतो.
बांगलादेशी क्रीडा पत्रकार देब चौधरी यांच्या मते, आयसीसी पाकिस्तानला बांगलादेशमार्फत भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा सामना झाला तर बांगलादेशला आयसीसीच्या महसुलाचा वाटा मिळू शकतो, ज्यामुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
एक मेसेज अन् फ्लाईट पकडलं, 5 तासांची सिक्रेट मीटिंग, पाकिस्तानच्या डर्टी गेममध्ये बांगलादेश कसं आलं?









