वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ! 13 बॉलमध्ये 3 रन हवे असतानाच अंपायरने रद्द केला सामना
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विजयासाठी 13 बॉलमध्ये 3 रनची गरज असताना, अंपायरनी अचानक मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. अंपायरच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
मुंबई : विजयासाठी 13 बॉलमध्ये 3 रनची गरज असताना, अंपायरनी अचानक मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. अंपायरच्या या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. 2025-26 च्या महिला बिग बॅश लीगच्या 27 व्या सामन्यात, अॅडलेड स्ट्रायकर्स महिला संघाचा सिडनी थंडर महिला संघाशी सामना झाला. या सामन्यात मोठा गोंधळ उडाला. सिडनी थंडरने जवळजवळ विजय निश्चित केला होता, पण नंतर अंपायरनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सामना रद्द केला. पावसामुळे सिडनी थंडरला मनस्ताप सहन करावा लागला.
सिडनी थंडरसोबत धोका?
पावसामुळे सामना व्यत्यय आला आणि सामना प्रत्येकी 5 ओव्हरचा खेळवावा लागला. अॅडलेड ओव्हलवर पहिले बॅटिंग करताना स्ट्रायकर्सने त्यांच्या पाच ओव्हरमध्ये 2 आऊट 45 रन केल्या. ओपनर लॉरा वोल्वार्डने स्ट्रायकर्सच्या डावाची आक्रमक सुरुवात केली, तिने 13 बॉलमध्ये 22 रन केल्या, ज्यामध्ये दोन फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. कर्णधार टहलिया मॅकग्रा 6 बॉलमध्ये 12 रन करून नाबाद राहिली, पण संघाचा स्कोअर फारसा पोहोचू शकला नाही. थंडरच्या बॉलरनी चांगली सुरुवात केली, शबनीम इस्माइलने एका ओव्हरमध्ये 6 रन देऊन एक बळी घेतला, तर लुसी फिनने 12 रनवर एक विकेट मिळवली.
advertisement
Nooooo way!
In a five-over game, the Thunder needed three more runs to win off 13 balls...
And umpires call for the covers with rain no heavier than it had been in the previous 15 minutes, per @TheoDrop.
Game called off, no result #WBBL11 pic.twitter.com/b24oi9XmsF
— 7Cricket (@7Cricket) November 28, 2025
advertisement
लक्ष्याचा पाठलाग करताना, थंडरची सुरुवात चांगली झाली. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन जोडल्या. सलामीवीर फोबी लिचफिल्डने आक्रमक बॅटिंग केली आणि 15 बॉलमध्ये पाच फोरसह नाबाद 38 रन केल्या. डार्सी ब्राउनने टाकलेल्या ओव्हरमध्ये तिने सलग चार फोर मारले. दुसऱ्या ओव्हरनंतर थंडरचा स्कोअर 35/0 झाला, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, पण तिसऱ्या ओव्हरच्या शेवटी पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला.
advertisement
लाईव्ह सामन्यात मोठा गोंधळ
थंडरने 2.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 43 रन केल्या, पण मुसळधार पावसाने खेळ थांबवला. थंडरला जिंकण्यासाठी शेवटच्या 3 रनची आवश्यकता होती, पण बॉल निसरडा असल्याचे कारण देत अंपायरनी सामना रद्द केला. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. थंडरची युवा स्टार फोबी लिचफिल्डने सामना रद्द झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आणि म्हणाली, "खूप निराशा झाली. हे लाजिरवाणे आहे." दरम्यान, स्ट्रायकर्सची कर्णधार ताहलिया मॅकग्रा म्हणाली, "कठीण निर्णय. पाऊस थांबला होता, पण बॉल निसरडा झाला होता. अंपायरनी योग्य निर्णय घेतला."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 11:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड क्रिकेटमध्ये खळबळ! 13 बॉलमध्ये 3 रन हवे असतानाच अंपायरने रद्द केला सामना











