झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; पण भारताचं टेन्शन का वाढलं? पाक सामन्यापूर्वी धोक्याची घंटा!
- Published by:Manoj Khandekar
Last Updated:
Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकीसमोर हतबल झाले, त्याच खेळपट्टीवर आता भारताला पाकिस्तानच्या 'मिस्ट्री' फिरकी आक्रमणाचा सामना करायचा आहे.
13 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबोत जे घडलं, त्याने क्रिकेट जगतातील दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारत केवळ विजयच मिळवला नाही, तर टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील सर्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली आहे. हा विजय केवळ ऑस्ट्रेलियाचा पराभव नाही, तर आगामी Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकीसमोर हतबल झाले, त्याच खेळपट्टीवर आता भारताला पाकिस्तानच्या 'मिस्ट्री' फिरकी आक्रमणाचा सामना करायचा आहे. झिम्बाब्वेच्या या विजयाने भारताचे 'टेन्शन'वाढवले आहे.
झिम्बॉब्वेकडून तगड्या ऑस्ट्रेलियाचा पराभव!
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हाच निर्णय त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 2 बाद 169 धावांचा मजबूत डोंगर उभा केला. झिम्बाब्वेसाठी सलामीवीर ब्रायन बेनेटने 64 धावांची नाबाद खेळी केली. त्याला ताडीवानाशे मरुमानी (35 धावा, 21 चेंडू), रायन बर्ल (35 धावा, 30 चेंडू) आणि सिकंदर रझा (25* धावा, 13 चेंडू) यांनी चांगली साथ दिली.
advertisement
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 29/4 अशी झाली होती. ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत अप्रतिम कामगिरी केली. अखेरीस ऑस्ट्रेलिया 19.3 षटकांत 169 धावांवर सर्वबाद झाला.
Australia v Zimbabwe | Match Highlights | T20WC 2026
advertisement
भारतासाठी वाढलं टेन्शन!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना याच आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानने आपले दोन्ही सामने याच मैदानावर खेळले असल्यामुळे त्यांना येथील खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे.
येथील मैदान मोठे असल्यामुळे षटकार मारणे सोपे नाही. झिम्बाब्वेने आपल्या डावात फक्त दोन षटकार मारले, तर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज षटकारांच्या प्रयत्नात बाद झाले. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सरळ सीमारेषा साधारण 80–90 मीटरपर्यंत लांब आहेत, तर चौकोनी बाजू थोड्या लहान आहेत.
advertisement
भारतीय संघातही काही बिग हिटर खेळाडू आहेत. मात्र येथील संथ खेळपट्टीवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात ते विकेट गमावू शकतात. याशिवाय पाकिस्तानकडे दर्जेदार फिरकीपटू आहेत, ज्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे नाही. ऑस्ट्रेलियालाही संथ चेंडूंवर जुळवून घेण्यात अडचणी आल्या.

AI Image
advertisement
फिरकी भारताची कमकुवत बाजू?
नामीबियाविरुद्धच्या सामन्यात भारताची फिरकीविरुद्धची कमकुवत बाजू उघड झाली. भारतीय फलंदाजांपैकी निम्मे खेळाडू फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर बाद झाले. पाकिस्तानकडे अब्रार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, सैम अयूब आणि उस्मान तारीक यांसारखे प्रभावी फिरकीपटू आहेत. चेंडूला वळण देण्यात हे गोलंदाज अत्यंत धोकादायक ठरू शकतात. उस्मान तारीक हा रहस्यमय फिरकीपटू पाकिस्तानचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो आणि भारत त्याच्याविरुद्ध प्रथमच खेळणार आहे.
advertisement
पाकिस्तानला मोठा फायदा होऊ शकतो
नामीबियाच्या तुलनेने कमी अनुभवी फिरकीपटूंविरुद्ध भारताला अडचणी आल्या असतील, तर पाकिस्तानच्या अनुभवी फिरकी आक्रमणाविरुद्ध त्यांना अधिक संघर्ष करावा लागू शकतो. तसे झाले, तर पाकिस्तानला मोठा फायदा होऊ शकतो. या स्पर्धेत आणि या फॉरमॅटमध्ये भारतावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान उत्सुक असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 3:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; पण भारताचं टेन्शन का वाढलं? पाक सामन्यापूर्वी धोक्याची घंटा!









