₹13,000 पासून 1 लाखांच्या स्मार्टफोन्सवर Republic Day ऑफर! पाहा पूर्ण लिस्ट 

Last Updated:

Amazon Great Republic Day Sale 2026 ची सुरुवात 16 जानेवारीपासून सुरु होत आहे. iPhone, Samsung, OnePlus, Redmi आणि iQOO स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. 10% बँक ऑफर आणि सोप्या ईएमआयची संधीही दिली जात आहे.

अॅमेझ़न ग्रेट रिपब्लिक डे
अॅमेझ़न ग्रेट रिपब्लिक डे
मुंबई : अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 ची प्रतिक्षा आता संपणार आहे. हा मोठा सेल 16 जानेवारी 2026 पासून सुरु होत आहे आणि यामध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची शानदार संधी मिळेल. Amazon या सेलच्या माध्यमातून Flipkart चा Republic Day Sale सेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. टेक लव्हर्ससाठी हा कालावधी खास आहे. कारण प्रीमियमपासून बजेट स्मार्टफोनपर्यंत मोठी सूट मिळणार आहे.
अ‍ॅमेझॉनने स्पष्ट केले आहे की, या सेलमध्ये Apple, Samsung, OnePlus, Realme, Redmi आणि iQOO सारख्या मोठ्या ब्रांड्सचे स्मार्टफोन्स कमी किंमतीत उपलब्ध असतील. यासोबतच HDFC बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 10% पर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. EMI ऑप्शनही उपलब्ध असेल. ज्यामुळे महाग फोन खरेदी करणे सोपे होईल.
advertisement
प्रीमियम स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट
या सेलमध्ये अनेक टॉप-एंड स्मार्टफोन्स स्वस्त किमतीत उपलब्ध असतील. Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत ₹1,29,999 वरून ₹1,19,999 पर्यंत कमी करण्यात आली आहे. iPhone 17 Pro आता ₹1,34,900 ऐवजी ₹1,25,400 मध्ये खरेदी करता येईल. OnePlus 15 वर देखील लक्षणीय सूट मिळत आहे, त्याची किंमत ₹76,999 वरून ₹68,999 पर्यंत कमी करण्यात आली आहे. iQOO 15 देखील ₹65,999 मध्ये उपलब्ध आहे.
advertisement
मिड-रेंज फोन देखील होतील स्वस्त 
  • मिड-रेंज सेगमेंटमध्येही उत्तम डील उपलब्ध असतील.
  • OnePlus 15R आता 54,999 ऐवजी 44,999 मध्ये उपलब्ध होईल.
  • iQOO Neo 10 5Gची किंमत ₹38,999 वरून ₹33,999 करण्यात आली आहे.
बजेट स्मार्टफोन्सवरील फायदे
advertisement
  • हा सेल बजेट असलेल्यांसाठी देखील फायदेशीर आहे.
  • वनप्लस नॉर्ड CE 5 आता ₹28,999 वरून कमी होऊन ₹22,999 मध्ये उपलब्ध आहे.
  • Redmi Note 15 5G ची किंमत ₹26,999 वरून कमी होऊन ₹20,999झाली आहे.
  • Realme Narzo 90x 5G आता फक्त ₹12,749 मध्ये खरेदी करता येईल.
एकंदरीत, Amazon Great Republic Day Sale 2026 हा स्मार्टफोन खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे. तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल खूप फायदेशीर ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
₹13,000 पासून 1 लाखांच्या स्मार्टफोन्सवर Republic Day ऑफर! पाहा पूर्ण लिस्ट 
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement