advertisement

UPI फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी BharatPe ने लॉन्च केलंय नवं फीचर! पहा कसं असेल

Last Updated:

BharatPe Shield Feature: भारतपेने नुकतीच शील्ड नावाची नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस यूझर्सना UPI फ्रॉडपासून वाचवण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भारत पे शिल्ड
भारत पे शिल्ड
BharatPe New Feature: भारतपेने नुकतीच शील्ड नावाची सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस यूझर्सना UPI फ्रॉडपासून वाचवण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही सर्व्हिस यूझर्सना फसवणूक, फिशिंग अटॅक आणि अनधिकृत व्यवहारांपासून संरक्षण प्रदान करते. एवढेच नाही तर ही सर्व्हिस यूझर्सना कव्हरेज देखील देते. याचा अर्थ असा की जर तुम्ही ऑनलाइन फसवणुकीत सामील असाल तर कव्हरेज देखील प्रदान केले जाईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ट्रायल पीरियडनंतर फीस
यूझर्सना 30 दिवसांचा चाचणी कालावधी मिळेल. या कालावधीत, यूझर्स ही सर्व्हिस विनामूल्य वापरू शकतात. ट्रायल पीरियड संपल्यानंतर, यूझर्सना दरमहा 19 रुपये फीस भरावी लागेल. असे असूनही, तुमची फसवणूक झाली तर हा प्लॅन तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत कव्हरेज देईल.
advertisement
कसे अॅक्टिव्ह करावे?
BharatPe शील्ड भारतपे ॲपच्या होम पेजवरून अॅक्सेस आणि अॅक्टिव्ह केले जाऊ शकते. हे फीचर Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध आहे. यूझर्स बॅनरवर क्लिक करून थेट ॲपच्या होमपेजवरून शील्ड अॅक्टिव्ह करू शकतात. तसंच, प्रथमच, BharatPe यूझर्सना शील्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी कॉन्टॅक्ट किंवा बिझनेसला किमान 1 रुपये द्यावे लागतील.
advertisement
क्लेम कसं करायचं?
एखाद्या यूझर्सची फसवणूक झाली तर तो कव्हरेजसाठी क्लेम करू शकतो. प्रोसेस सुलभ करण्यासाठी BharatPe ने OneAssist सोबत भागीदारी केली आहे. क्लेम दाखल करण्यासाठी, यूझर्स OneAssist ॲप डाउनलोड करू शकतात किंवा टोल-फ्री नंबर 1800-123-3330 वर कॉल करू शकतात. तसंच, दावा करण्यासाठी, यूझर्सना 10 दिवसांच्या आत रिपोर्ट करावी लागेल.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यूझर्सना काही कागदपत्रेही सादर करावी लागतील. यूझर्सना UPI स्टेटमेंट, पोलिस रिपोर्ट किंवा FIR ची कॉपी, क्लेम फॉर्म, UPI अकाउंट ब्लॉक केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
UPI फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी BharatPe ने लॉन्च केलंय नवं फीचर! पहा कसं असेल
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement