advertisement

Google Chrome चा नवा AI टूल बनावट वेबसाइटची करेल पोलखोल, पण कशी?

Last Updated:

Google Chrome AI Tool for Scam Websites: गुगल क्रोमवर एक नवीन एआय टूल लवकरच येत आहे जे बनावट वेबसाइट्सची पोलखोल करेल. एवढेच नाही तर या टूलच्या आगमनाने तुमचा डेटाही सुरक्षित राहील.

क्रोम
क्रोम
Google Chrome AI Tool for Scam Websites: तुम्ही देखील ऑनलाइन सर्चसाठी लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर Google Chrome वापरत आहात, तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट येत आहे. आजकाल कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे Artificial Intelligence म्हणजेच AI चा वापर घोटाळे आणि बनावट वेबसाइट शोधण्यासाठी करेल. अलीकडेच ही माहिती X वर सुप्रसिद्ध टिपस्टर Leopova64 ने दिली.
बनावट वेबसाइटचा पर्दाफाश करेल
एक पोस्ट शेअर करताना, टिपस्टरने म्हटले आहे की, Google ने Chrome च्या कॅनरी व्हर्जनमध्ये “Client-Side Detection for Brand and Scam Detection” नावाचा नवीन प्लॅग अॅड केला आहे. त्याच्या नावाप्रमाणे, हे फीचर AI चा वापर अशा वेबसाइट्सचे विश्लेषण आणि ओळख करण्यासाठी करेल जे यूझर्सना काही घोटाळ्यात अडकवू शकतात किंवा त्यांची फसवणूक करतात.
advertisement
डेटाही सुरक्षित राहील
असे म्हटले जात आहे की, यासाठी ब्राउझर ऑन-डिव्हाइस LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉडेलच्या मदतीने काम करेल. हे फीचर Mac, Linux आणि Windows वर उपलब्ध असलेल्या Chrome च्या विविध व्हर्जनसाठी डिझाइन केले आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिव्हाइसवरच होईल, ज्यामुळे तुमचा डेटा क्लाउडवर पाठवला जाणार नाही आणि तुमचा सर्व डेटा देखील सुरक्षित राहील. हे अशा यूझर्ससाठी उपयुक्त आहे जे बऱ्याचदा अज्ञात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाइटला भेट देतात.
advertisement
हे नवीन टूल कसे वापरायचे?
- तुम्हाला हे टूल वापरायचे असेल, तर आधी तुम्हाला तुमच्या सिस्टीमवर क्रोम कॅनरी इंस्टॉल करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये "chrome://flags" टाइप करावे लागेल.
- आता उघडणाऱ्या पेजमध्ये “Client-Side Detection for Brand and Scam Detection” शोधा.
advertisement
- यानंतर, येथून तुम्ही हा फ्लॅग Enable किंवा Disable करू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Chrome चा नवा AI टूल बनावट वेबसाइटची करेल पोलखोल, पण कशी?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement