advertisement

उन्हाळी सुट्टीत गावाला जायचं? गर्दीचं टेन्शन विसरा, पुणे विभागातून 74 अतिरिक्त बसेस धावणार

Last Updated:

पुणे विभागाने 74 अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त बसेस 14 एप्रिल ते 10 जून 2026 या कालावधीत धावणार आहेत .

सुट्टीत गावाला जायचं? गर्दीचं टेन्शन विसरा.. पुणे विभागातून अतिरिक्त बसेस
सुट्टीत गावाला जायचं? गर्दीचं टेन्शन विसरा.. पुणे विभागातून अतिरिक्त बसेस
पुणे: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात अनेक प्रवासी गावाकडे जाण्यासाठी एसटी बससेवेचा वापर करतात. त्यामुळे पुणे विभागातील बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने 74 अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त बसेस 14 एप्रिल ते 10 जून 2026 या कालावधीत धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागातून 74 जादा बसेसची व्यवस्था
पुणे विभागातून 74 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण अनेकजण उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, विविध कार्यालयांतील कर्मचारी तसेच औद्योगिक भागातील कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे एसटी बससेवेवर प्रवाशांचा ताण वाढतो.
ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाकडून अतिरिक्त बसेस चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. या विशेष बसेस अक्कलकोट, तासगाव, कोल्हापूर, पंढरपूर, जळगाव, कळण, सप्तशृंगी, अकोला, अहमदपूर तसेच गोंदवले या प्रमुख मार्गांवर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले की उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे विभागातून सुमारे 74 अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी एसटी सेवेचा अधिकाधिक वापर करून या अतिरिक्त बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्टीत गावाला जायचं? गर्दीचं टेन्शन विसरा, पुणे विभागातून 74 अतिरिक्त बसेस धावणार
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement