advertisement

ब्रिटीश खुणा पुसल्या! जुना एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त; किती महिन्यांत उभारणार डबल डेकर पूल?

Last Updated:

Elphinstone Bridge Update : मुंबईतील एल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात आला असून आता येथे नवीन डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. मात्र हा नवा पूल कधीपर्यंत उभारला जाणार आहे त्याबाबत एक अपडेट आलेली आहे.

ल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात आला असून आता येथे नवीन डबलडेकर पूल उभारला जाणार आहे.
ल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात आला असून आता येथे नवीन डबलडेकर पूल उभारला जाणार आहे.
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पुलाच्या पाडकामाची प्रतिक्षा सुरु होती ते अखेर पूर्ण झाले असून नव्या पुलाच्या उद्घाटनाबाबतीत ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.
एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम यशस्वी
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम होणार होते मात्र विविध कारणांमुळे ते रखडले गेले होते मात्र शनिवारी रात्री मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यात आला.विशेष म्हणजे मध्य रेल्वे आणि महारेल यांच्या प्रयत्नातून हे मोठे काम फक्त एका रात्रीत पूर्ण करण्यात आलेले आहे. या कामासाठी साडेसात तासांचा महाब्लॉक घेण्यात आला होता.
advertisement
साधारण रात्री अकरा वाजता या कामाला सुरुवात झाली होती. त्यात मोठे लोखंडी गर्डर्स हटवण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री तसेच मोठ्या क्रेनचा वापरही करण्यात आला शिवाय 100 कामगार, अभियंते आणि अधिकारी असे सर्वजण रात्रभर काम करत होते. हे काम संपताच मिशन एल्फिन्स्टन पूर्ण झाल्याची घोषण करण्यात आली आणि सर्वांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला.
advertisement
नव्या पूलासाठी किती काळ वाट पाहावी लागणार?
एल्फिन्स्टन पूल पाडण्यामागील कारण म्हणजे या ठिकाणी नवा मार्ग उभारण्यात येणार आहे. जो असेल वरळी-शिवडी उन्नत मार्ग. त्यात आता या ठिकाणी नवीन डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. नवा पूल साधारण चार महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या नव्या पूलासाठी लागणारे महत्त्वाचे गर्डर्स नोएडा येथून लवकर मुंबईत आणण्यात येतील शिवाय नव्या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण केले जाईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ब्रिटीश खुणा पुसल्या! जुना एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त; किती महिन्यांत उभारणार डबल डेकर पूल?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement