तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना? वापरा ही सोपी ट्रिक्स, दोन मिनिटांत कळेल

Last Updated:

आपली अनेक कामं सध्या मोबाईलवरच अवलंबून असतात. अशावेळी आपला मोबाईल सुरक्षित राहाणं महत्त्वाचं असतं.

News18
News18
Mobile Hack : आजच्या काळात मोबाईल हा एक दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य घटक झालाय. अगदी सकाळचा अलार्म झाल्यापासून ते रात्री पुन्हा झोपेपर्यंत मोबाईल हा अनेक जणांच्या हातातच असतो. विविध महत्त्वाची कामे करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळेच तुम्ही वापरत असलेला मोबाईल हॅक झाला तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचा मोबाईल हॅक झाला आहे का, हे ओळखणं सोपं आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.
तुमचा स्मार्टफोन हॅक झाल्यास किंवा तुम्ही मोबाईलवरून केलेले कॉल इतरांना ऐकू जात असल्यास, काय करावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हॅक झाला आहे की नाही, हे समजू शकते.
हॅकिंगपासून वाचण्यासाठी हे करा
तुम्हाला तुमचा मोबाईल हॅकिंगपासून सुरक्षित ठेवायचा असेल, तर सर्वात प्रथम फोनमधील स्पाय अ‍ॅप काढून टाका. हे स्पाय अ‍ॅप्स अनेकदा फोन हॅक करण्याचं काम करतात. अशावेळी तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन कोणकोणत्या अ‍ॅप्सला तुम्ही माइक किंवा कॅमेऱ्याची परवानगी दिली आहे, ते तपासू शकता. जर कोणत्याही अ‍ॅपला अनावश्यक परवानग्या दिल्या असतील, तर ते अ‍ॅप त्वरित अनइंस्टॉल करा.
advertisement
हॅकिंगचे संकेत
स्मार्टफोनमध्ये अनेक असे फीचर्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचा फोन हॅक झाला आहे किंवा नाही, हे ओळखू शकतात. खरतर जेव्हा तुम्ही फोनच्या माइकचा वापर करीत असता, तेव्हा अँड्रॉइड फोनच्या उजव्या बाजूला ग्रीन डॉट दिसतो. मात्र तुम्ही फोन वापरत नसताना किंवा तुम्ही माइकचा ॲक्सेस दिला नसतानाही फोनच्या उजव्या बाजूला ग्रीन डॉट किंवा लहान माईक आयकॉन दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा फोन हॅक झाला असून कोणीतरी तुमचे बोलणे ऐकत आहे.
advertisement
तसेच स्मार्टफोन हॅकिंग शोधण्यासाठी हा एकमेव ऑप्शन नाही. याशिवाय, फोन हॅक झाला आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी विविध संकेत आहेत. यामध्ये स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपणे, हे देखील हॅकिंगचं लक्षण आहे. तसेच मोबाईल परफॉर्मेंस, मोबाईलचा स्पीड कमी होणे, हा देखील हॅकिंगचा संकेत आहे. फोन कॉल सुरू असताना मधून मधून बीप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक मशीनचा आवाज येत असेल, तर तुमचा फोन हॅकिंग झाल्याचा तो संकेत आहे. दरम्यान, मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे तो हॅक होणार नाही, यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना? वापरा ही सोपी ट्रिक्स, दोन मिनिटांत कळेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement