तीन मैत्रीणींची गोष्ट अन् ते भावूक करणारं गाणं, पाहाल तर पाणावतील डोळे,VIDEO

Marathi Sad Song : 'गुलाबी' चित्रपटातील 'फिरुनी नव्याने जन्मेन मी' हे गाणं खूपच भानविक आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडले. या चित्रपटात कथा तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रीयांभोवती फिरताना दिसते. तिघांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. एकीचे दोन ब्रेकअप झाले, त्यामुळे तिला रिलेशनशिप नको आहेत. दुसरी डॉक्टर आहे, तिचे आणि नवऱ्यासोबत भावनिक संबंध काहीच नाहीयेत. तर तिसऱ्या स्त्रीचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोण खूप वेगळा आहे. चित्रपटात स्त्रीयांचे स्वातंत्र्य, ताणतणाव, संघर्ष, स्वप्न आणि त्या संघर्षातून होणारी दृढ मैत्री आणि मुक्त होण्याची भावनिक कथा आहे. हे गाणं आर्या आंबेकरने गायले आहे. तर साई पियुष यांनी गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. या चित्रपटात श्रृती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्निनी भावे, शैलेश दातार, सुहास जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Last Updated: Dec 16, 2025, 21:19 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
तीन मैत्रीणींची गोष्ट अन् ते भावूक करणारं गाणं, पाहाल तर पाणावतील डोळे,VIDEO
advertisement
advertisement
advertisement