जळगाव : जळगाव हे सोन्याच्या शुद्धतेसाठी तर जिल्हा कापूस आणि केळीच्या भांडारासाठी प्रसिद्ध आहे. खान्देशचा भाग असलेल्या जळगावकरांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या काही पदार्थांची चव लयभारी असते. त्यापैकीच जळगावातील अस्सल मेनूची सुरुवात होते ती भरताच्या वांग्यापासून. खान्देशात भरीतासोबत पारंपरिक खाद्य म्हणजे कळण्याची भाकरी खाल्ली जाते. बऱ्याच वेळा हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात तेव्हा कळण्याची भाकर आणि कोशिंबीर असा बेत असतो. विशेषतः पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना भरीताचा आस्वाद आवर्जून देतात. याच भरीताची रेसिपी कशी करायची याबद्दल आपल्याला गृहिणी जागृती चौधरी यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 27, 2025, 19:19 IST


