जालना: भल्या पहाटे आपल्या दारावर आलेले गोंधळी तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चाललंय. मात्र जालन्यातील उगले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून गोंधळी कला जोपासण्याचे काम करतंय. संबळाच्या तालावर सुरेल आवाजात लोकदेवतांची गाणी म्हणून ते आपली उपजीविका करतात. मात्र हल्लीच्या इंटरनेटच्या काळामध्ये त्यांच्या या कलेला राजश्रय मिळेनासा झालाय. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील त्यांच्या यात्रेला भाव देत नाहीत. यामुळेच या कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीये.
Last Updated: November 17, 2025, 18:25 IST