शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी त्यांच्या अपघात तपासणीला आक्रमक भूमिका घेतली आहे. ते विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत सातत्याने अपघातावर भाष्य करत आहेत.त्यातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे.रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.



