अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी केल्या आहेत.यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.



