मोर्चाला यायला सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली वाजवा: राज ठाकरे

Author :
Last Updated : महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्याला मनसेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली होती. मतदान यंत्राच्या घोळाबाबत किंबहुना मतचोरी कशी होऊ शकते, याचे प्रात्याक्षिक मनसेच्या मंचावर उपाध्याय आणि पटेल नामे गृहस्थांनी सादर केले. त्यानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी स्वच्छ मतदार याद्यांचा आग्रह धरत १ तारखेच्या मोर्चाला येण्याची विनंती केली. कार्यालयात बॉसने सुट्टी दिली नाही तर त्याच्या मुस्काटात द्या, कानाखाली वाजवा, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्या मनातील रोष दाखविण्यासाठी सगळ्यांनी मोर्चाला येण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मोर्चाला यायला सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली वाजवा: राज ठाकरे