दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताची एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केली जात असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. या प्रकरणात सरकारच संशयाचं भूत का नाचवत आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील मुद्दे, तांत्रिक गोष्टी सांगितल्या.मात्र, त्यांचा एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जात आहेत, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.



