राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असतानाच, आता मुंबई महानगर पालिकेत कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचाच लक्ष आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युतीही पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांच्या जागावाटपाचा तेढ नेमका काय आहे? यावर मोठी चर्चा होत आहे. तेव्हाच शिवसेना उबाठाचे खासदार ,संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं की,"जागांवरुन कोणतीही रस्सीखेच नाही. मुंबई पालिका निवडणुक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची,अस्मितेची लढाई आहे."
Last Updated: Dec 28, 2025, 16:27 IST


