Eknath Shinde Speech | विधान परिषद निरोप समारंभादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत अनेक नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आठवण काढत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच अजित पवारांच्या जाण्यामुळे अमोल मिटकरी यांचं मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख केल्यामुळे सभागृहात वेगळीच चर्चा रंगली.



