मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र श्रीनिवार पवार यांचा विवाह नुकताच थाटामाटात पार पडला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह बहरीन येथे पार पडत असून या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खासदास सुप्रिया सुळे यांनी हे व्हिडीओ शेअर केले आहे.



