कोल्हापुरात एक प्रचारात एक वेगळा रंग पाहायला मिळाला. आम आदमी पार्टीचे शाहिर दिलीप सावंत आपल्या लेकीसोबत निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपली मुलगी दिप्ती जाधव यांच्यासोबत डफ तुंतुण वाजवत प्रचार केला आहे.त्यांनी या शाहिरी मधून समस्या आणि सामाजिक प्रश्न मांडले आहेत. आम आदमी पार्टीमधून दिप्ती जाधव उभ्या राहिल्या आहेत.



