मुंबई: भारतात ट्रॅक्टर, शेती आणि कन्स्ट्रक्शनसाठी टायर्स तयार करणारी प्रसिद्ध कंपनी BKT (बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड) आता टू-व्हीलर आणि ऑन-रोड कमर्शियल वाहनांच्या मार्केटमध्ये नवीन टायर्स घेऊन आली आहे. आतापर्यंत कंपनीची ओळख मोठ्या वाहनांच्या टायर्ससाठी होती, पण आता कंपनीने आपला फोकस टू-व्हीलर आणि हायवेवर धावणाऱ्या गाड्यांकडे वळवला आहे.



